Ajit Pawar | ‘दादा तुमची खूपच कसरत होतेय’; सुप्रिया सुळेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत | पुढारी

Ajit Pawar | 'दादा तुमची खूपच कसरत होतेय'; सुप्रिया सुळेंची 'ती' पोस्ट चर्चेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे काल (दि.१० सप्टेंबर) पुणे, कोल्हापूर दौऱ्यावर होते. दरम्यान, अजित पवार यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. कोल्हापुरातील सभेत त्यांनी यशवंतराव चव्हाणांचा दाखला देत, त्यांच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी ‘ओढून ताणून समर्थन करताना आपली खूपच कसरत होते आहे’ ट्विट केले आहे. ही पोस्ट राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे रिट्विट केली आहे. (Ajit Pawar)

राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केलेल्या ट्विमध्ये म्हटले आहे, दादा तुम्ही कोल्हापुरात आपल्या निर्णयाचे समर्थन करण्यासाठी यशवंतराव चव्हाणांचा दाखला दिला. पण ते कधीही भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले नव्हते. त्यांनी कधीच मूलभूत विचारांशी तडजोड केली नव्हती. दादा, राष्ट्रवादीतून बाहेर जाण्याच्या चुकलेल्या राजकीय भूमिकेचे तुम्ही ओढून ताणून समर्थन करताना तुमची खूपच कसरत होते आहे, असेही लवांडे यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. (Ajit Pawar)

Ajit Pawar : दबावाला भीक घालणारी आमची औलाद नाही : अजित पवार

दबाव असल्याने आम्ही सत्तेमध्ये सामील झालो, अशी आमची बदनामी केली जात आहे; परंतु लोकांची कामे पूर्ण करण्याचा आमच्यावर दबाव होता. कामांना लागलेली स्थगिती उठविण्यासाठी दबाव होता, असे स्पष्ट करत कुठल्याही दबावाला भीक घालणारी आमची औलाद नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल (दि. १०) विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. कोल्हापुरातील तपोवन मैदानावर राष्ट्रवादीच्या उत्तरदायित्व सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

हेही वाचा:

Back to top button