‘भावी मुख्यमंत्री’चे बॅनर पाहून अजित पवार म्हणतात, ‘मुख्यमंत्री होण्यासाठी..’ | पुढारी

‘भावी मुख्यमंत्री’चे बॅनर पाहून अजित पवार म्हणतात, 'मुख्यमंत्री होण्यासाठी..'

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  मुख्यमंत्री होण्यासाठी 145 ची मॅजिक फिगर गाठावी लागते. ही वेळ कधी येईल सांगता येत नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरात रोड शोच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन केले. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. त्यामध्ये कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री अजित पवार असे फलक झळकावले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्री होणार का ? असे पत्रकारांनी विचारले असता अजित पवार म्हणाले, भावी मुख्यमंत्री असे बॅनर लावून काही होत नाही. मुख्यमंत्री होण्यासाठी 145 ची मॅजिक फिगर गाठावी लागते. ही वेळ कधी येईल सांगता येत नाही. त्यामुळे आपण आपले काम करत राहावे, असे सांगत त्यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.

मुंबईत आज सर्वपक्षीय बैठक
मराठा आरक्षणासाठी उपोषण करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा सुरू आहे. मात्र, अद्यापही यश आलेले नाही. यापूर्वी बैठक झाली. मात्र, त्यातून काही तोडगा निघाला नाही. मात्र, या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी सह्याद्री अतिथीगृहावर बोलावली आहे, असे पवार यांनी सांगितले.

हे ही वाचा :

G 20 Dinner : निमंत्रण पत्रिकेवर President of India ऐवजी लिहिले President of Bharat; वाचा सविस्तर

जुन्या धरणांच्या सुरक्षेची चिंता

Back to top button