Santosh Juvekar : दिव्य कुमार यांच्या गाण्यावर संतोष जुवेकर घालतोय धुमाकूळ (Video) | पुढारी

Santosh Juvekar : दिव्य कुमार यांच्या गाण्यावर संतोष जुवेकर घालतोय धुमाकूळ (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : गोकुळाष्टमीचे निमित्त साधून नुकतेच प्रदर्शित झालेले ‘गोविंदा आया आया’ गाण्याची भूरळ सर्वांना पडलीय. ‘अल्ट्रा म्युझिक’ प्रस्तुत गाण्यात ‘संतोष जुवेकर’ कान्हाच्या (Santosh Juvekar) रूपात गोकुळातल्या सगळ्या गोपिकांना भुरळ घालतो आहे. (Santosh Juvekar) ‘दिव्य कुमार’ यांच्या रांगड्या आवजातलं धुमशान घालणारं गाणं ‘मुकेश शर्मा’ यांनी शब्दबद्ध केले आहे. ‘काशी कश्यप’ यांनी संगीतबद्ध केले आहे. तसेच गाण्याचा ठेका धरून ‘सिद्धेश दळवी’ यांनी उत्स्फूर्त नृत्यदिग्दर्शन केले आहे.

“खास कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने समृद्धीचं वातावरण निर्माण व्हावं आणि प्रत्येकाने दहीहंडीचा खास प्रसंग खास गाण्यासोबत उत्साहाने साजरा करावा म्हणून ‘गोविंदा आया आया’ गाणं प्रदर्शित करत आहोत.” अल्ट्रा मिडिया अँड एंटरटेनमेंट सांगितले आहे.

Back to top button