

पुढारी ऑनलाईन डेस्क : ग्लॅमरस मलायकाचे (Malaika Arora ) फॅशन सेन्स नेहमीच कमालीचे असते. पारंपरिक असो वा टॅॅड्शनल लूक तिच्यावर प्रत्येक पेहराव शोभून दिसतो. आताही तिने काही ग्लॅमरस फोटोशूट केले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये अनेक कॉमेंट्स पाहायला मिळत आहेत. (Malaika Arora )
लेटेस्ट फोटोशूटमध्ये मलायका सॅटीन बॉडीकॉन गाऊनमध्ये खूप सुंदर दिसतेय. सुंदर ईअरिंग्ज, हातात अंगठी आणि डार्क रेड लिपस्टीक, बन हेअरस्टाईल, असा ग्लो मेकअप तिने पूर्ण केलाय. मलायकाच्या डीपनेक ऑफशोल्डर गाऊनवर सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत. तिने इन्स्टावर हे फोटो अपलोड केले आहेत. या फोटोजना तिने कॅप्शन दिलीय-???????? Gown –
मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुनच्या ब्रेकअपची चर्चा सध्या सुरू आहे. रिपोर्टनुसार, अर्जुन आणि मलायका यांचे ब्रेकअप झाले आहे.पण दोघांनाही यावर मौन बाळगले आहे. दरम्यान, मलायका अरोराने एक पोस्ट शेअर केली आहे, जी खूप व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये लिहिलंय – जर तुम्हाला आवडत नसेल की, ती कशी ॲक्टिंग करत आहे, तर स्वत:ला पाहा तुम्ही तिला कसे ट्रीट करत आहात.
मलायकाने एक गुड मॉर्निंग कोट देखील शेअर केला आहे-यामध्ये लिहिलंय-आपल्या भविष्याची देखभाल करण्याची सर्वात चांगली पद्धत आहे की, आपल्या आजच्या क्षणांची काळजी घ्या, लक्ष द्या.
मलायकाआणिर अर्जुन कपूर यांच्या ब्रेकअपची चर्चा तेव्हा सुरु झाली जेव्हा लोकांनी नोटीस केलं की, अर्जुन कपूरच्या कोणत्याही पोस्टवर मलायका कॉमेंट करत नाहीये. असेही वृत्त आहे की, अर्जुन कपूर कुशा कपिलाला डेट करत आहे. दोघांचा करण जोहरच्या घरी झालेल्या पार्टीमधून ग्रुप फोटो व्हायरल झाला होता. परंतु, कुशाने फोटो व्हायरल झाल्यानंतर स्पष्ट केलं की ती अर्जुन कपूरला डेट करत नाहीये.