Sukhee Movie :तारीख ठरली! शिल्पा शेट्टीचा 'सुखी'चा ट्रेलर या दिवशी येणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिल्पा शेट्टी कुंद्राच्या (Sukhee Movie) आगामी चित्रपट “सुखी”चा बहुप्रतीक्षित ट्रेलर ६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. (Sukhee Movie) शिल्पाचे चाहते यासाठी उत्सुक आहेत. शिल्पा तिच्या अष्टपैलुत्वासाठी आणि मनमोहक प्रतिभेसाठी ओळखली जाते. तिच्या “सुखी” मधील अभिनयाने तिच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना पुन्हा एकदा मंत्रमुग्ध करण्यासाठी ती सज्ज झाली आहे. ट्रेलर रिलीजच्या बातमीने आता सगळ्यांना ट्रेलरची उत्सुकता लागली आहे.
अभिनेत्री म्हणून शिल्पा शेट्टी कुंद्राची उत्क्रांती अफलातून आहे. तिच्या आगामी चित्रपट “सुखी”साठी चाहत्यांमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढवली आहे. ६ सप्टेंबरला ट्रेलर रिलीज होण्यासाठी शिल्पाचे फॅन्स वाट बघत आहेत.
चित्रपटाची कथा आणि कलाकारांची झलक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चर्चा वाढवत आहे. चाहते तिच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. “सुखी” एक अत्यंत अपेक्षित सिनेमॅटिक अनुभव असणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अमित साध, चैतन्य चौधरी, किरण कुमार आणि कुशा कपिला यांसारख्या अफलातून प्रतिभावान कलाकारांचा समावेश आहे.
- Bhumi Pednekar : भूमी पेडणेकरच्या नव्या चित्रपटाचे पोस्टर रिलीज, उद्या ट्रेलर येणार
- Malaika Arora : ग्लॅमरस मलायकाच्या नव्या पोस्टने खळबळ, अर्जुनसोबत ब्रेकअप?
- अमिताभ बच्चन यांचे ‘भारत माता की जय’, ट्विट होतेय व्हायरल
View this post on Instagram