Pune Weather : पुण्यात पुढील चार दिवस 'जलधारा'
पुणे : शहरात बुधवार ते शनिवार असा चार दिवस मध्यम पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने दिला आहे. शहरात गुरुवार व शुक्रवारी पावसाचा जोर राहणार आहे. घाटमाथ्याला 6 व 7 रोजी येलो अलर्ट देण्यात आला आहे. मंगळवारी शहराचे तापमान पुन्हा वाढले व अस्वस्थ करणारा उकाडा जाणवत होता.
मात्र, सायंकाळी पुन्हा गार वारे सुटल्याने हायसे वाटू लागले. दरम्यान, बुधवारपासून शहरात पुन्हा पावसाला सुरुवात होत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने शहरात 6 ते 9 सप्टेंबरपर्यंत मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
हेही वाचा
Dengue Patient : राज्यात मलेरियाचे रुग्ण कमी; डेंग्यू, चिकुनगुनियाचा ‘ताप’
सातारा : खुनातील संशयित 8 महिन्यांनी सापडला
काय सांगता? याआधी तीन मुली, नंतर तिळ्यांना जन्म; पुण्यात महिलेची यशस्वी प्रसुती