Chhattisgarh Assembly Elections | छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारविरोधात भाजपकडून ‘आरोप पत्र’ जारी | पुढारी

Chhattisgarh Assembly Elections | छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारविरोधात भाजपकडून 'आरोप पत्र' जारी

रायपूर (छत्तीसगड) : पुढारी ऑनलाईन; छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा (Union Home Minister Amit Shah)  यांनी आज रायपूरमध्ये काँग्रेस सरकारविरोधात ‘आरोप पत्र’ (Aarop Patra) जारी केले. छत्तीसगड दौऱ्यावर असलेल्या अमित शहा आज येथील एका सभेला संबोधित करणार आहेत. येथे वर्षाच्याअखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. शुक्रवारी संध्याकाळी छत्तीसगडमध्ये दाखल झालेले अमित शहा भाजपच्या कोअर ग्रुपसोबत बैठक घेऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. (Chhattisgarh Assembly Elections)

अमित शहा रायपूर येथील आणि महासमुंद जिल्ह्यातील सरायपाली येथील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, त्यांनी आज रायपूर येथील पं. दीनदयाळ उपाध्याय सभागृहात भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारविरुद्ध ‘आरोप पत्र’ (आरोपपत्र) जारी केले.

“…गेल्या पाच वर्षांत त्यांनी (मुख्यमंत्री भूपेश बघेल) गांधी घराण्याचे एटीएम बनण्याचे आणि गरिबांचे पैसे लुटण्याचे काम केले…”असा गंभीर आरोप अमित शहा यांनी रायपूरमध्ये बोलताना केला. “रमण सिंह मुख्यमंत्री असताना त्यांनी प्रत्येक घरापर्यंत रेशन पोहोचवण्यासाठी अंगठ्याचा ठसा देण्याची प्रणाली सुरू केली. छत्तीसगडमध्ये त्यांना ‘चावल वाले बाबा’ म्हणून ओळखले जात होते. गरिबांना रेशन देण्याचे काम भाजपने केले आहे. भूपेश बघेल सरकारने गरिबांचे रेशन हिसकावून घेण्याचे काम केले आहे…” अशा शब्दांत त्यांनी राज्यातील भूपेश बघेल सरकारवर हल्लाबोल केला.

छत्तीसगडमध्ये रमण सिंह यांच्या नेतृत्वाखाली सरकार २००३ पासून १५ वर्षे सत्तेत राहिल्यानंतर २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा काँग्रेसने पराभव केला. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने राज्यातील ९० पैकी ६८ जागा जिंकल्या, तर भाजपला १५ जागांवर समाधान मानावे लागले. जेसीसी (J) ने ५ जागा मिळवल्या आणि त्याचा मित्रपक्ष बीएसपीला २ जागा मिळाल्या होत्या. (Chhattisgarh Assembly Elections)

हे ही वाचा :

 

Back to top button