पिंपरी : पीएमपीचे ब्रेक फेल; अन् रस्त्यावर ऑईल | पुढारी

पिंपरी : पीएमपीचे ब्रेक फेल; अन् रस्त्यावर ऑईल

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : निगडी येथील भक्ति-शक्ति उड्डान पुलावर पीएमपीचे ब्रेक फेल झाल्यामुळे पुलावर बुधवार (दि. 30) दुपारी पाच वाजता मोठ्या प्रमाणात ऑईल गळती झाली. रस्त्यावर सांडलेल्या आईलमुळे तेथून जाणारी वाहने घसरण्याच्या घटना घडल्या. याबाबत अग्निशमन कर्मचांर्‍यांना माहिती मिळताच त्यांनी पाणी टाकून हा मार्ग स्वच्छ केला.

यावेळी घटना स्थळावर अग्नीशमन दलाचे अधिकारी आणि चार कर्मचारी उपस्थित होते. परिसरात पसरलेले ऑईल पाणी मारून स्वच्छ केले. याबाबत अग्निशमनचे अधिकारी सोमनाथ तुकदेव हे माहिती देताना म्हणाले की, रस्त्यावर ऑईलच्या गळतीमुळे चार ते पाच दुचाकी वाहने घसरून पडल्याची माहिती दिली.

हेही वाचा

नाशिक क्राईम : सायबर भामट्यांकडून शहरातील तिघांना १३ लाखांचा गंडा

’माळेगाव’चा ऊसदर ’सोमेश्वर’पेक्षा रुपये जास्त

टाकळीभान : पाण्यावरुन महिलांनी गाजवली ग्रामसभा

Back to top button