धक्कादायक ! दीरासह दोघांकडून बलात्कार, सासर्‍यानेही केला विनयभंग | पुढारी

धक्कादायक ! दीरासह दोघांकडून बलात्कार, सासर्‍यानेही केला विनयभंग

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  विवाहिता घरात एकटी असल्याचे पाहून दीर आणि नणंदेच्या नवर्‍याने तिच्यावर बलात्कार केला. सासर्‍यानेदेखील विवाहितेवर अतिप्रसंग करीत विनयभंग केला. त्यानंतर शेवटी पतीने विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत तिलाच दोष दिला. ही धक्कादायक घटना सोमवारी (दि. 28) वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती, सासरा, दीर यांच्यासह एकूण दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिलेचे आरोपी पतीशी जुलै 2015 मध्ये लग्न झाले. दरम्यान, महिलेला दोन मुली झाल्या. मुली झाल्याच्या कारणावरून आरोपींनी आपापसात संगनमत करीत महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केला. सन 2019 मध्ये विवाहिता घरात एकटी असताना दीर आणि नणंदेच्या नवरा यांनी मिळून तिच्यावर बलात्कार केला. तसेच, सासर्‍यानेदेखील एकदा जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पती साथ देईल, अशी अपेक्षा असताना त्यानेदेखील विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे. शेवटी कोणीच साथ देत नसल्याचे लक्षात आल्याने विवाहितेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

हेही वाचा :

पिंपरी : गणेशमूर्ती विक्री स्टॉलला परवाना सक्तीचा

पिंपरी : ग्रामीण भागात अजूनही पोलिस पाटलांवरच मदार

Back to top button