पिंपरी : गणेशमूर्ती विक्री स्टॉलला परवाना सक्तीचा

पिंपरी : गणेशमूर्ती विक्री स्टॉलला परवाना सक्तीचा
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  अवघ्या तीन आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी गणेश मूर्तीची विक्रीसाठी स्टॉल उभारण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा व्यवसाय परवाना घेणे सक्तीचे आहे. त्याशिवाय स्टॉल टाकल्यास कारवाई केली जाण्याची भीती विक्रेत्यांना सतावत आहे. त्यामुळे व्यवसाय परवाना घेण्यासाठी अर्जाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुढील महिन्यात 19 तारखेला गणरायाचे आगमन होत आहे. सार्वजनिक गणेश मंडळ, हाऊसिंग सोसायट्या, कॉलनी, वसाहत तसेच, घरोघरी गणेशमूर्ती बसविली जाते. त्यासाठी शहरभरात शेकडो स्टॉल उभारून मूर्तीची विक्री केली जाते. मूर्ती विक्रीतून कोट्यवधींची उलाढाल होते. शहरातील काही कारखान्यात मूर्ती तयार करून त्याची विक्री केली जाते.

मूर्ती विक्रीचे स्टॉल उभारण्यासाठी महापालिकेचा व्यवसाय परवाना असणे बंधनकारक आहे. त्यासाठी 499 रुपये शुल्क भरावे लागते. तसेच, अर्जासोबत जागेचा नकाशा, 100 रुपयांच्या स्टँप पेपरवर प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड व पॅनकार्डची झेराक्सप्रत जोडावी लागते. परवाना मिळाल्यानंतर 19 सप्टेंबरपर्यंत मूर्तीची विक्री करता येणार आहे. व्यवसाय परवाना असल्यास संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडून स्टॉलसाठी मंडप टाकण्यास परवानगी दिली जाते. त्यासाठी वाहतूक पोलिसांचाही ना हरकत दाखला जोडणे
आवश्यक असते.

व्यवसाय परवानासाठी 193 अर्ज
पिंपरी-चिंचवड शहरात गणेशमूर्ती विक्री करण्यासाठी महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाकडे मंगळवार (दि.29) पर्यंत एकूण 193 अर्ज आले आहेत. त्यावर तात्काळ कार्यवाही करून परवाना दिला जात आहे. व्यवसाय परवाना असल्याशिवाय मूर्ती विक्री केल्यास कारवाई केली जाणार आहे, असे आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांनी सांगितले.

परवाना न घेताच काहींनी थाटले स्टॉल
महापालिकेचा व्यवसाय परवाना दाखला न घेताच शहरात काही विक्रेत्यांनी गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल टाकले आहेत. तर, मूर्ती तयार करणार्‍या शेडच्या दर्शनी भागात स्टॉल तयार करण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news