Gold prices Today | सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटचा दर | पुढारी

Gold prices Today | सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटचा दर

पुढारी ऑनलाईन : सोन्याच्या दराने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. आज मंगळवारी शुद्ध सोन्याचा म्हणजेच २४ कॅरेटचा दर प्रति १० ग्रॅम ५८,८९८ रुपयांवर खुला झाला. कालच्या तुलनेत सोन्याच्या दरात आज २३१ रुपयांनी वाढ झाली आहे. चांदीचा दरही वाढून प्रति किलो ७३,८५५ रुपयांवर खुला झाला आहे. काल सोमवारी शुद्ध सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५८,६६७ रुपयांवर बंद झाला होता. तर चांदीचा दर प्रति किलो ७३,६३६ रुपयांवर होता. (Gold prices Today)

पुढारी न्यूज – सॅटेलाईट चॅनल आजपासून लोकसेवेत

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज मंगळवारी (दि.२९) २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५८,८९८ रुपये, २३ कॅरेट ५८,६६३ रुपये, २२ कॅरेट ५३,९५० रुपये, १८ कॅरेट ४४,१७३ रुपये आणि १४ कॅरेटचा दर ३४,४५५ रुपयांवर खुला झाला आहे. चांदीचा दर प्रति किलो ७३,८५५ रुपयांवर पोहोचला आहे.

दरम्यान, मंगळवारी एमसीएक्सवर (MCX) सोन्याचे भाव वाढले. तर चांदीचे दरही ०.२८ टक्क्यांनी वाढले. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर, सोन्याचा ऑक्टोबर फ्युचर्स दर ९४ रुपयांनी म्हणजेच ०.१६ टक्के वाढून प्रति १० ग्रॅम ५८,९८१ रुपयांवर गेला. तर चांदीचा सप्टेंबर फ्युचर्स दर २०८ रुपयांनी वाढून प्रति किलो ७३,८२० रुपयांवर पोहोचला.

कमकुवत झालेला डॉलर इंडेक्स आणि बाँड यिल्ड मंदावल्याने सोन्या-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पॉट गोल्ड ०.३ टक्के वाढून प्रति औंस १,९२४.८४ डॉलरवर पोहोचले. ऑगस्ट नंतरची सोन्याच्या दराची ही उच्चांकी पातळी आहे. यूएस गोल्ड फ्युचर्स ०.३ टक्के वाढून १,९५२.९० डॉलरवर गेले आहे. (Gold prices Today)

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

Back to top button