ऑनलाईन कर्ज (Online Loan) घेतल्याने तत्काळ आर्थिक दिलासा मिळतो; मात्र या प्रक्रियेत खबरदारी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. ऑनलाईन कर्जाबाबत सातत्याने ग्राहकांना फोन येत असतात; मात्र ते सर्वच खात्रीशीर आणि विश्वासार्ह असतातच असे नाही.
आजकाल सायबर हॅकिंगचे आणि फसवणुकीचे प्रकार पाहता ऑनलाईन कर्ज घेताना सजग राहणे तितकेच महत्त्वाचे आहे. आजच्या डिजिटल युगात तातडीची आर्थिक निकड भागविण्यासाठी ऑनलाईन लोन हा एक सोपा आणि सुविधाजनक मार्ग आहे. अर्थात, कोणत्याही प्रकारच्या आर्थिक निर्णयाप्रमाणेच ऑनलाईन कर्ज घेताना काही खबरदारी घेणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. काय काळजी घ्यावी, हे पाहू!
Online Loan : कर्जदात्यांची सखोल माहिती घ्या : वेगवेगळ्या ऑनलाईन लेंडर्सची माहिती मिळवण्यासाठी आणि तुलना करण्यासाठी वेळ काढा. बाजारात संबंधित लेेंडर्सची स्थिती काय आहे, हे जाणून घ्या. ग्राहकांचे मत, व्याज दर, अटी पाहा. लेंडर हा योग्य आणि विश्वासार्ह आहे की नाही, हे तपासा.
व्याज दर आणि शुल्क आकारणी : ऑनलाईन लेंडर्समध्ये व्याज दरात फरक राहू शकतो. वार्षिक दर आकारणी आणि कर्जाशी संबंधित कोणतेही अतिरिक्त शुल्क जाणून असाल, तर कर्ज घेण्यासाठीच्या संभाव्य खर्चाचे स्पष्टपणे आकलन करता येईल.
Online Loan : आर्थिक स्थिती तपासा : कर्ज घेण्यापूर्वी आर्थिक स्थितीचे मूल्यांकन करायला हवे. किती कर्जाची गरज आहे, प्रत्यक्षात कर्ज फेडण्यास कितपत सक्षम आहात, हे जाणून घ्या. मासिक उत्पन्न, बजेट आणि सध्याच्या आर्थिक जबाबदार्या यावर विचार करा.
नियम आणि अटी : कर्ज कराराच्या अटी आणि नियम काळजीपूर्वक वाचा आणि समजून घ्या. रीपेमेंटच्या अटी, विलंब पेमेंटसाठी आकारला जाणारा दंड आणि कर्जावर कळत-नकळतपणे पडणार्या परिणामांकडे लक्ष द्या.
छुपे शुल्क : कर्ज करारात छुपे शुल्क आणि अटींबाबत सजग राहा. काही कर्जदाते प्रीपेेमेंटपोटी दंड, अर्जासाठीचे शुल्क आणि अन्य अप्रत्यक्ष शुल्क आकारू शकतात.
Online Loan : व्यक्तिगत माहिती सुरक्षित ठेवा : केवळ सुरक्षित संकेतस्थळ असणार्या नामांकित लेंडर्सला व्यक्तिगत आणि फायनान्शियल माहिती द्या. कर्ज देणार्या कंपनीतील संकेतस्थळ यूआरएलमध्ये एचटीटीपीएस पाहा आणि एक पॅडलॉक चिन्हांची तपासणी करा. यावरून सुरक्षित कनेक्शनची खात्री पटेल.
गरजेएवढेच कर्ज घ्या : वास्तविक गरजेपेक्षा अधिक कर्ज घेण्याच्या आमिषापासून दूर राहा. अकारण जादा कर्ज घेतल्याने अधिक व्याज भरावे लागते आणि परिणामी आर्थिक ताण वाढू शकतो.
रीपेमेंटच्या फ्लेक्झिबिलिटीवर विचार करा : कर्जाच्या रिपेमेंटबाबत लवचिक धोरण ठेवणार्या कंपनीकडून कर्ज घेण्याचा विचार करावा. काही लेंडर रीपेमेंटसाठी शुल्क आकारतात, तर काही कोणताही जादा दंड न आकारता रीपेमेंटची सुविधा देतात.
Online Loan : गैरव्यवहारापासून सजग राहा : ऑनलाईन कर्ज प्रकरणातील संभाव्य गैरव्यवहारापासून सावध राहा. अधिकृत लेंडर हे सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय पैसे मागत नाहीत किंवा कर्ज मान्यतेची हमी देत नाहीत. याउलट फसवेगिरी करणार्या कंपन्या सातत्याने शुल्काची मागणी करत राहतात आणि वसूल करत राहतात.
ग्राहकांच्या प्रतिक्रिया पाहा : सध्या कर्जदार असलेल्या ग्राहकांच्या संबंधित संकेतस्थळावरील प्रतिक्रिया पाहा. या आढव्यातून ग्राहक सेवा, पारदर्शकता, शुल्क आकारणी आणि वसुली याची माहिती कळते. यानुसार विचारपूर्वक निर्णय घेऊ शकतो.
परवाना आणि नियमांची तपासणी : लेंडरला आपल्या भागात, राज्यात आणि देशात काम करण्याची परवानगी आहे की नाही, हे पाहा. ऑनलाईन कर्ज देण्यासंबंधी क्षेत्रनिहाय नियम वेगळे आहेत.
Online Loan : अन्य पर्यायाचा वापर : ऑनलाईन कर्ज घेण्यापूर्वी पारंपरिक बँका, क्रेडिट संस्था, मित्र आणि कुटुंबातील सदस्यांकडून कर्ज घेण्याचे अन्य पर्याय जाणून घ्या. सहकारी बँका, गोल्ड लोन यासारख्या गोष्टींचा विचार करायला हरकत नाही. अर्थात, ऑनलाईनवर कर्ज घेतल्याने तातडीने आर्थिक दिलासा मिळतो; पण त्याची प्रक्रिया सावधगिरीने करणे गरजेचे आहे. लेंडर्सची स्थिती चांगल्या रितीने समजून घ्यावी. अटी व नियम जाणून आपली आर्थिक क्षमता ओळखा. याप्रमाणे आर्थिक ध्येय गाठण्यासाठी आणि गरज पूर्ण करण्यासाठी योग्य निर्णय घेऊ शकतो.