पुणे शहरात 14 सोनोग्राफी सेंटरवर कारवाई | पुढारी

पुणे शहरात 14 सोनोग्राफी सेंटरवर कारवाई

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे गेल्या दोन महिन्यांमध्ये 14 सोनोग्राफी सेंटरवर कारवाई केली आहे. पाहणीमध्ये त्रुटी आढळल्याने सोनोग्राफी सेंटर 2 ते 7 दिवसांसाठी सील करण्यात आली. महिनाभरात त्रुटी दूर न केल्यास पुन्हा कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

शहरात आरोग्य विभागांतर्गत 776 सोनोग्राफी सेंटर नोंदणीकृत आहेत. सेंटरच्या पाहणीत त्रुटी आढळून आल्यावर सेंटरना नोटिसा पाठवण्यात आल्या. सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चा करून कारवाईचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली.

काय आढळल्या त्रुटी?
फार्म एफ भरलेले नसणे
अर्जावर डॉक्टर किंवा गर्भवती महिलेची सही नसणे
अपुरी कागदपत्रे
नोंदणी वही अपूर्ण असणे
महिन्याचा अहवाल वेळेत न पाठवणे

हेही वाचा

‘पुढारी न्यूज’ टी.व्ही. चॅनलचे आज लाँचिंग

सातारा : गतवर्षी धरणे 94 टक्के, यंदा 80 टक्क्यांवरच

कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात आजपासून गाभार्‍याजवळून पूर्ववत दर्शन

Back to top button