संगमनेर : गोड वाटणारा खोटे बोलतो, तोच खरा शत्रू : राठी महाराज | पुढारी

संगमनेर : गोड वाटणारा खोटे बोलतो, तोच खरा शत्रू : राठी महाराज

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  गोड बोलणारा खोटेही बोलत असतो आणि त्याचे खोटे बोलणे त्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. त्यामुळे नेहमी खरे बोलत जा, कधीही खोटे बोलू नका. खोटे बोलणारच खरा आपला शत्रू असल्याचे शिवपुराण कथाकार माधवदास महाराज राठी यांनी सांगितले. संगमनेर तालुक्यातील जाखुरी येथे स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह शिवपुराण कथेचे पाचवे पुष्प गुंफताना माधवदास महाराज राठी बोलत होते यावेळी गगनगिरी महाराजांचे पुतणे सरदार बापूसाहेब पाटणकर, नातू रामराव पाटणकर, तान्हाजीराव पाटणकर, राजेंद्र पाटणकर, श्रीपाद महाराज कुलकर्णी, खा. सदाशिव लोखंडे, आ. बाळासाहेब थोरात यांच्या पत्नी कांचनताई थोरात, प्रमोद राहणे, किसन शिंदे, नानासाहेब शिंदे, रामभाऊ राहणे, सप्ताह कमिटीचे अध्यक्ष दिलीपराव शिंदे, संजय महाराज देशमुख, बाळू महाराज, रावीगिरी महाराज, आबासाहेब थोरात, कपिल पवार, पृथ्वीराज थोरात, बाळासाहेब ताजने, दादाभाऊ वर्पे, पोपट येवले, बाळासाहेब देशमुख, किसनराव पानसरे, नितीन पानसरे, पोपट आगलावे, सुदीप वाकळे, महेश वाकचौरे, अभिषेक थोरात, आदी मान्यवर उपस्थित होते.

राठी महराज म्हणाले, पती परमेश्वर आहे असे मानून पत्नीने आपले हातातली सर्व कामे बाजूला टाकावीत आणि त्यांची सेवा करावी. घरातील गोष्टींची उणीव अगर कमतरता सगळीकडे उघडे करून सांगू नये, कुणाच्याही इकडे तिकडे चुघल्या करू नका. कोणाच्याही संसाराचं वाटोळ ेहोईल किंवा भेद निर्माण होईल भांडण निर्माण होईल, असे कधीही वागू नका.

एखादी मुलगी सासरी येताना पतीच्या विश्वासावर आपले सर्वस्व सोडते, त्याच्या आवडी- निवडी त्याच्या नातेवाईकांशी आपला संबंध जोडून घेते. मात्र दुर्दैवाने आम्ही सर्व काही विसरून जातो. म्हणून घटस्फोटा सारख्या घटना वारंवार घडतात. कुलदेवतेची प्रसन्नता प्राप्त करा, आपल्या इतरांची प्रसन्नता प्राप्त करा, त्यांची कृपा मिळवा, आई-वडिलांची वडीलधार्‍यांची सेवा करा, अपेक्षा केली की भगवंत उपेक्षा करतो, देवाकडे जो मागतो त्याला भगवंत कधीच देत नाही. मात्र देव तुम्हाला न मागता देतो ते मागण्याची तुम्हाला गरज नाही. लोकांचा गैरफायदा घेण्याकरता बरेच जण टपून बसलेले आहे. या सगळ्यांचा विचार करा, जोपर्यंत मानसिक स्वास्थ्य नाही, तोपर्यंत शारीरिक स्वास्थ जीवनात आवश्यक असल्याचे सांगितले.

ओझर गावाने दिली 100 साखर पोती
तालुक्यातील ओझर खुर्द गावाला गगनगिरी महाराज सप्ताहसाठी साखर देण्याचे आवाहन केले. त्या आवाहनाला प्रतिसाद देत ओझर खुर्द ग्रामस्थांनी व गगनगिरी भक्तांनी अवघ्या दोन तासात शंभर पोते साखर देण्याचे मान्य केले. गगनगिरी महाराजांचा जयजयकार करत वाजत गाजत घेऊन आले. तसेच संगमनेर तालुक्यातील वाघापूर येथील ग्रामस्थांनी एकत्रित येत 40 तेल डब्बे सप्ताहास दिले.

हेही वाचा :

Assam | प्रायव्हेट फोटो झाले व्हायरल, भाजप महिला नेत्याने उचललं टोकाचं पाऊल

नगर : उघड्या वाहनातून कचरा वाहतूक ; घंटागाडीवरील कर्मचार्‍यांचे उद्धट वर्तन

Back to top button