Assam | प्रायव्हेट फोटो झाले व्हायरल, भाजप महिला नेत्याने उचललं टोकाचं पाऊल | पुढारी

Assam | प्रायव्हेट फोटो झाले व्हायरल, भाजप महिला नेत्याने उचललं टोकाचं पाऊल

पुढारी ऑनलाईन डेस्क : आसाममध्ये भाजपच्या एका महिला नेत्याने जीवन संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. एका भाजप नेत्यासोबतचे त्यांचे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे माहिती मिळत आहे. इंद्राणी तहबिलदा (वय ४८) असे मृत महिला नेत्याचे नाव असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

आसाम भाजपच्या किसान मोर्चाच्या सचिव इंद्राणी तहबिलदा शुक्रवारी गुवाहाटी येथील बामुनी मैदाम येथील त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आल्या. इंद्राणी आणि आसामच्या गोलाघाट जिल्ह्यातील भाजप किसान मोर्चाच्या एका वरिष्ठ नेत्याचे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तहबिलदा यांचे खासगी फोटो व्हायरल झाल्यानेच त्यांनी हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहिती मिळत असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून फोटो व्हायरल करणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सूरू आहे.

दरम्यान, आसाम प्रदेश भाजपचे अध्यक्ष भावेश कलिता यांनी किसान मोर्चाचे ज्येष्ठ नेते अनुराग चालिया यांची पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून हकालपट्टी केली आहे. या प्रकरणात अनुराग यांचे नाव येत असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी अनुराग चालियाला ताब्यात घेतले असून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

हेही वाचा : 

Back to top button