कुरकुंभ एमआयडीसीतील कंपनीतील महिलेचा विनयभंग | पुढारी

कुरकुंभ एमआयडीसीतील कंपनीतील महिलेचा विनयभंग

अजय कांबळे

कुरकुंभ(ता. दौंड); पुढारी वृत्तसेवा : कुरकुंभ एमआयडीसीतील एका कंपनीतील कंत्राटदारांच्या सुपरवायझरने कंत्राटी कामगार असलेल्या एका महिलेकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करीत अंगावर ओढून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याबाबत पीडित महिलेने दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी सुपरवायझर किरण गोरड (पूर्ण नाव पत्ता नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण गोरड हा फिरंगाई काॅन्ट्रॅक्टमधील सोड्यासको प्रायव्हेट लिमिटेडचा सुपरवायझर आहे. फिरंगाई काॅन्ट्रॅक्टमार्फत कंत्राटी पध्दतीने पीडित महिला टेलरिंग कामासाठी कामाला आहे. पीडित महिला काम करीत असताना ती एकटी असल्याचा फायदा घेत किरण गोरड याने पीडितेला अंगावर ओढून घेऊन मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. हा प्रकार बाहेर कोणाला सांगितल्यास कामावरून काढून टाकू अशी धमकी दिली. तु मला काॅल व मेसेज करत जा असे म्हणून तो निघून गेला.

कामावरून काढून टाकण्याच्या भीतीने हा प्रकार पीडितेने कोणाला सांगितला नाही. किरण गोरड पीडितेला वारंवार त्रास देत होता. २९ एप्रिल २०२३ रोजी कामावर असताना पीडित महिलेला टाकाऊ मालाचे रजिस्टर घेऊन किरण गोरड यानी बोलविले. आज कामावर जास्त लोक नाही. येथे सीसीटीव्ही कॅमेरा नाही, असे म्हणत हात धरून अंगावर ओढून तुझ्याशी शारीरिक संबंध ठेवायचे असून दहा ते पंधरा मिनीट वेळ दे ,असे म्हणाला. पीडितेने तुम्हाला काही भान आहे का तुम्ही काय करता असे म्हणाली. दरम्यान हा प्रकार बाहेर कोणाला सांगितल्यास कामावरून काढून टाकण्याची पुन्हा धमकी दिली.

मे महिन्यात चार ते पाच वेळा एकटी असल्याचा फायदा घेत एकांतात चला असे म्हणत होता. याबाबत पीडित महिलेने कंपनीचे एच.आर. व महिला कमिटीकडे तक्रार करणार असल्याचे सांगितल्यावर त्याने माफी मागितली. घडलेला प्रकार १२ जुन २०२३ रोजी पीडित महिलेने सांगितला. एच.आर यानी लेखी अर्ज देण्यास सांगितला. १३ जुन २०२३ लेखी अर्ज केला. एच.आर. विकास शिंदे व महिला कमिटीने दोघांचे अर्ज वाचून परत कळवितो असे सांगितले. पीडित महिलेने पुन्हा विचारणा केल्यावर ९० दिवसांचा कालावधी लागेल, वाट बघावी लागेल असे सांगितले.

कंपनीकडून न्याय मिळत नसल्याने पीडित महिला जीव देण्याच्या उद्देशाने रेल्वे स्टेशनवर रडत बसली असताना तिला आबा वाघमारे भेटले. त्यांना झालेला सर्व प्रकार सांगितला. या प्रकाराबद्दल त्याना लेखी अर्ज दिला. आबा वाघमारे यांनी कंपनीकडे घडलेल्या प्रकाराची लेखी तक्रारी केली. आबा वाघमारे व पीडित महिलेला चर्चेसाठी कंपनीत बोलविण्यात आले. तोंडी आश्वासन दिले. मात्र, किरण गोरड याच्यावरील कारवाईबाबत प्रतिसाद मिळत नसल्याने आंदोलन करण्याबाबत फलक लावला. यानंतर चर्चा करून हे प्रकरण मिटविण्यास सांगितले. परंतू त्यास नकार देत महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

हेही वाचा

’झटपट वीज कनेक्शन’चा आठ हजार ग्राहकांना लाभ

भुदरगड तालुक्यात लम्पी रोगाचा धुमाकूळ!

सांगली : कुपोषित बालकांची संख्या निम्म्याने घटली

Back to top button