छ.संभाजीनगर : भाजप पदाधिकाऱ्याच्या वाहनाच्या धडकेत दोघे गंभीर | पुढारी

छ.संभाजीनगर : भाजप पदाधिकाऱ्याच्या वाहनाच्या धडकेत दोघे गंभीर

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण येथील भाजपचे उपजिल्हा अध्यक्ष तथा पैठणचे माजी तालुका अध्यक्ष डॉ सुनील शिंदे यांच्या चारचाकी वाहनाची मोटरसायकलला जोरदार धडक बसली. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले. तालुक्यातील ढाकेफळ रस्त्यावर सोमवारी (दि.२८) हा अपघात झाला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, याबाबत अधिक माहिती अशी, इसाक यासीन शेख या आपल्या मुलासोबत मोटरसायकलवरून लग्नकार्याला जात होते. यादरम्यान वाडगाव ते ढाकफळ रस्त्यावर चारचाकी वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या वाहनातून भाजप पदाधिकारी डॉ सुनील शिंदे व आणखी एकजण प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. अपघात यासीन शेख यांच्याबरोबर त्यांचा मुलगाही गंभीर जखमी झाल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा :

Back to top button