पिंपरी : ‘पीएमपी’च्या 100 चालकांना महापालिकेतून माघारी बोलाविले | पुढारी

पिंपरी : ‘पीएमपी’च्या 100 चालकांना महापालिकेतून माघारी बोलाविले

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पीएमपीएलकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे वर्ग झालेल्या 100 बसचालकांना तत्काळ पुन्हा पीएमपीएलमध्ये रुजू होण्याचे आदेश व्यवस्थापकीय संचालक सुचेंद्र प्रताप सिंह यांनी दिले आहे. त्यानुसार आतापर्यंत 38 चालक पीएमपीएलमध्ये रूजू झाले आहेत. पीएमपीएलच्या ताफ्यात नवीन बसगाड्या मोठ्या संख्येने सामील होत आहेत. त्यामुळे बसचालकांची संख्या अपुरी पडत आहे. परिणामी, कंत्राटी चालक नेमावे लागत आहे. त्यांच्या कामाबाबत अनेक तक्रारी आहेत.

चालकांचा तुटवडा भरून काढण्यासाठी पीएमपीएलने पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे वर्ग केलेल्या 100 चालकांना पुन्हा पीएमपीएलमध्ये तातडीने रूजू होण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत. त्यानुसार पालिकेतील 38 चालक पीएमपीएलमध्ये रूजू झाले आहे. उर्वरित चालक रूजू न झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक सिंह यांनी दिला आहे.
दरम्यान, पीएमपीएलचे हे कर्मचारी चालक पदाचे काम सोडून पालिकेत इतर कामे करीत आहेत.

सूचनेनुसार पालिकेची कारवाई

पीएमपीएलला बसचालकांची कमतरता आहे. त्यामुळे पीएमपीएलने पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे हस्तांतरित झालेल्या 100 चालकांना माघारी बोलविले आहे. तसे, आदेश त्या सर्व कर्मचार्‍यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून त्या कर्मचार्‍यांना पालिका सेवेतून कार्यमुक्त करण्याची कार्यवाही सुरू आहे, असे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

हेही वाचा

पुणे : समाविष्ट गावांतील कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ!

पाथर्डी : शेतजमिनी परत मिळण्याचा मार्ग मोकळा; एरडा मध्यम प्रकल्प

रखडलेल्या पावसाने घात केला; जूनमध्ये मराठवाड्यात ८२ शेतकऱ्यांनी जीवन संपवले | ग्राऊंड रिपोर्ट

Back to top button