Monsoon Session 2023 : ‘महिला बचत गट’ निधीत भरीव वाढ; मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा | पुढारी

Monsoon Session 2023 : 'महिला बचत गट' निधीत भरीव वाढ; मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा

पुढारी ऑनलाईन: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.२८ जुलै) पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत ‘उमेद’ अभियानातील महिला बचत गटांसाठी मोठी घोषणा केली आहे. महिला गटांना दिल्या जाणाऱ्या निधीत आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या महिलेच्या मानधनात दुप्पट वाढ करण्यात आली असल्याची त्यांनी विधानसभेत (Monsoon Session 2023) बोलताना सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘उमेद’ अभियानातील महिलांच्या स्वयं सहाय्यता गटांना देण्यात येणाऱ्या निधीत दुपटीने वाढ करून तो ३० हजार रूपये करण्यात आला आहे. तर या गटांना गावपातळीवर मार्गदर्शन करणाऱ्या महिलेच्या मानधनात देखील भरीव वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या वाढीमुळे अतिरिक्त ९१३ कोटी रुपये एवढ्या निधीची तरतूद राज्य शासनामार्फत करण्यात येणार असल्याचे आज शिंदे यांनी विधानसभेत स्पष्ट (Monsoon Session 2023) केले.

स्वयं सहाय्यता गटांना दैनंदिन मार्गदर्शन करण्यासाठी गावपातळीवर एकूण ४६ हजार ९५६ समुदाय संसाधन व्यक्ती(CRP) कार्यरत आहेत. त्यांना सर्वसाधारणपणे दरमहा ३ हजार रुपये मानधन देण्यात येते. बचत गट चळवळीतील त्यांचे योगदान व मागणी लक्षात घेऊन त्यांच्या मानधनात वाढ करून ते प्रतिमहा ६ हजार रुपये एवढे करण्यात (Monsoon Session 2023) येणार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभेत बोलताना स्पष्ट केले.

स्वयंसहाय्यता गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे मूल्यवर्धन, गुणवत्तेत वाढ, आधुनिक पॅकेजिंग व ब्रॅंडिंगकरिता प्रोत्साहन, उत्पादनांना हक्काची बाजारेपठ उपलब्ध करून दिली जाईल. तसेच विविध उपक्रम राबवून ग्रामीण महिलांचे सर्वार्थाने सक्षमीकरण करण्यासाठी शासन भविष्यात देखील कटिबध्द आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. शालेय विद्यार्थ्यांचे गणवेश देखील महिला स्वयं सहायता गटांमार्फत घेण्यात येतील, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभेत  सांगितले.

हे ही वाचा:

Back to top button