मणिपूर अत्‍याचारप्रकरणी गदाराेळ, ‘आप’ खा. संजय सिंह राज्‍यसभेतून निलंबित | पुढारी

मणिपूर अत्‍याचारप्रकरणी गदाराेळ, 'आप' खा. संजय सिंह राज्‍यसभेतून निलंबित

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणल्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह ( AAP MP Sanjay Singh ) यांच्‍यावर राज्‍यसभा सभापतींनी आज ( दि. २४) निलंबनाची कारवाई केली.

आज सभागृहाचे कामकाज सुरु झाल्‍यानंतर मणिपूर हिंसाचार व अत्‍याचार प्रकरणी विरोधी पक्षाचे सदस्‍य आक्रमक झाले. सरकार चर्चेसाठी तयार आहे, तरीही कारवाईत अडथळा आणला जात आहे, असे यावेळी खासदार पियुष गोयल यांनी सांगितले.
वारंवार नकार देऊनही संजय सिंह यांनी सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणल्याचे राज्यसभा अध्यक्षांनी सांगितले. त्यामुळे त्याला संपूर्ण पावसाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. पीयूष गोयल यांच्या तक्रारीवरून राज्यसभा सभापतींनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे आता संजय सिंह यांना संपूर्ण अधिवेशनात राज्यसभेत प्रवेश करता येणार नाही.

हेही वाचा :

 

Back to top button