Mothers Day Special : मातृत्वाला आहे तब्बल १८ लाख वर्षांचा इतिहास; जाणून घ्या रंजक माहिती | पुढारी

Mothers Day Special : मातृत्वाला आहे तब्बल १८ लाख वर्षांचा इतिहास; जाणून घ्या रंजक माहिती

पुढारी ऑनलाईन: मे महिन्यातील दुसरा रविवार मातृदिन (मदर्स डे) म्हणून साजरा केला जातो. आईप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. मातृदिनाची सुरुवात रोमान साम्राज्याची काळात सुरुवात झाली; पण १९१४ला अमेरिकेत (Mothers Day Special) मदर्स डे निमित्त पहिल्यांदा राष्ट्रीय सुटी देण्यात आली. म्हणजेच आधुनिक मदर्स डेचा इतिहास ११० वर्षांचा आहे. पण माणसात मातृत्त्वाचा इतिहासमात्र तब्बल १८ लाख वर्षांचा आहे.

Mothers Day: मातृत्वाच्या इतिहासातील ठळक मुद्दे

  • मनुष्याच्या इतिहासात मातृत्त्वाचा इतिहासमात्र तब्बल १८ लाख वर्षांचा आहे.
  •  माणसाला माणूसपण देणारी सर्वांत महत्त्वाची कल्पना म्हणजे मातृत्व से मानले जाते.
  •  १८ लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेतील एका माणसाच्या प्रजातीतूनच मातृत्त्वाचा विकास झाल्याचे मानले जाते.
  •  मातृदिनाची सुरुवात रोमान साम्राज्याची काळात सुरुवात झाली.
  • आधुनिक मदर्स डेचा इतिहास ११० वर्षांचा आहे

मानवी उत्क्रांतीत मातृत्वाचा उदय ही अतिशय ऐतिहासिक घटना मानली जाते. याचे कारण म्हणजे यातूनच पुढे माणसाचा विकासाला नवे आयाम मिळत गेले. माणसाला माणूसपण देणारी सर्वांत महत्त्वाची कल्पना म्हणजे मातृत्व असे मानले जाते. मातृत्व (Mothers Day Special) कसे विकसित झाले हा इतिहासच मुळात अतिशय रंजक आहे. बाळाची सर्वाधिक प्रदीर्घ काळजी घेणारा प्राणी म्हणजे मनुष्य होय. आपण सस्तन प्राण्यांपुरता जरी विचार केला तरी माकड, हत्ती, वाघ, कुत्री अशा प्राण्यांत नवजात बाळाची काळजी काही महिनेच घेतली जाते. मनुष्य वगळता जवळपास सर्वच सस्तन प्राण्याची बाळं ही जन्मानंतर काही तासातच स्वतःच्या पायावर उभी राहू शकतात. पण माणसाच्या बाळाची मात्र काळजी पुढे बरीच महिने घ्यावी लागते.

अमेरिकेतील मानववंश शास्त्राच्या प्राध्यापक सारा ब्लाफर हर्डी याच विषयावर , Mothers and Others: The Evolutionary Origins of Mutual Understanding हे पुस्तक लिहिले आहे. त्या म्हणतात, “जवळपास १८ लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत दोन पायावर चालणारी माणसाची प्रजाती अस्तित्वात आली होती. या प्रजातीच्या मेंदूचा विकास होत होता.”

इतर सस्तन प्राण्यांचा विचार केला तर माणसाचे बाळ हे पूर्ण असाह्य असते. या बाळाची बरीच वाढ आईच्या गर्भाबाहेर होत असते. माणसाच्या मेंदूचा विकास होत होता आणि माणूस आता दोन पायांवर सरळ चालत होता. मेंदूत वाढ होत असल्याने माणसाच्या जीवनमानात बदल होत होते आणि सामाजिक व्यवस्था आकारास येत होती; पण माणसाचा मेंदू वाढत असताना माणसाच्या माकड हाडातील पोकळी मात्र लहान बनली होती, त्यामुळे आईला मुलाला लवकर जन्म देणे भाग होते. पण एका अर्थाने नव्याने जन्मलेली बाळं एक प्रकारे अविकसित असतात. ही बाळं त्यांच्या पालकांवर (Mothers Day Special) प्रदीर्घ काळ अवलंबून असतात.

या उत्क्रांतीत या बाळांना सांभाळण्यासाठी पालकांच्या बरोबरीनेच समूहातील इतर सदस्यांचीही मदत लागू लागली होती. या बाळांना सांभाळण्याच्या गरजेतून माणसाला समाजव्यवस्था निर्माण करावी लागली, आणि यातून माणसाची प्रजाती टिकू शकली. पालकांव्यतिरिक्त समूहातील इतर सदस्यांच्या मदतीशिवाय माणसाची बाळं जगणे शक्यच नव्हते. यातून आणखी एक क्षमता विकसित झाली ती म्हणजे एकमेकांना सहकार्य करणे. यातून बाळांमध्ये समजून घेण्याची, इतर माणसांशी जुळवून घेण्याची क्षमताही विकसित होत गेली.

हेही  वाचा:

Back to top button