Jayant Savarkar passes away | ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन, वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Jayant Savarkar passes away | ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन, वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई, पुढारी ऑनलाईन : ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे वृद्धापकाळाने निधन आहे. आजारपणामुळे त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरु होते. त्यांनी ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. जयंत सावरकर यांनी १०० हून अधिक मराठी आणि ३० हून अधिक हिंदी चित्रपटांत काम केले आहे.

जयंत सावरकर यांनी वयाच्या २० व्या वर्षापासून अभिनयाची कारकीर्द सुरू केली होती. सुरुवातीला बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर अनेक नाटकांमध्ये त्यांना संधी मिळाली. आचार्य अत्रे यांच्या सम्राट सिंह नाटकातील त्यांची विदुषकाची भूमिका खूप गाजली होती. अपराध मीच केला (गोळे मास्तर), अपूर्णांक (ब्रम्हे), अलीबाबा चाळीस चोर (खुदाबक्ष), एकच प्याला (तळीराम), कळलाव्या कांद्याची कहाणी (कारभारी; मंगळ्या), दिवा जळू दे सारी रात (पोस्टमास्तर) अशा अनेक नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या.

हल्लीच ते 'आई कुठे काय करते' मालिकेत दिसले होते. अजय देवगण, इरफान खान, जॉन अब्राहम यासारख्या हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्यांसोबत काम केले आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news