Monsoon Session : मणिपूर हिंसाचारावरून आज पुन्हा संसदेत गदारोळ; दोन्ही सभागृह तहकूब | पुढारी

Monsoon Session : मणिपूर हिंसाचारावरून आज पुन्हा संसदेत गदारोळ; दोन्ही सभागृह तहकूब

पुढारी ऑनलाईन : पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही पुन्हा मणिपूर हिंसाचारावर संसदेत गदारोळ झाला. अधिवेशन सुरू असतानाच विरोधकांनी ‘इंडिया फॉर मणिपूर’ आणि ‘इंडिया डिमांड पीएम स्टेटमेंट ऑन मणिपूर’ अशा फलकांसह जोरदार घोषणाबाजी केली. संसदेत मणिपूरवर चर्चा व्हावी आणि पंतप्रधानांनी उत्तर द्यावे या मागणीवर विरोधक ठाम आहेत. यानंतर दोन्ही सभागृहाचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब (Monsoon Session) करण्यात आले आहे.

आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात विरोधी पक्षाकडून मणिपूर प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाची मागणी केली. दरम्यान, विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी करत गदारोळ केला. यानंतर लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दुपारपर्यंत तहकूब करण्यात आले. दरम्यान. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘आम्ही संसदेत चर्चेसाठी तयार आहोत’, असे मत सभागृहात (Monsoon Session) मांडले.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहात मणिपूरवरील पंतप्रधानांच्या विधानाची मागणी करणाऱ्या विरोधी पक्षांच्या खासदारांची घोषणाबाजी सुरूच आहे. दरम्यान मणिपूर मुद्द्यावरून सभागृहातील विरोधकांच्या गदारोळात राज्यसभेच्या अध्यक्षांनी आप खासदार संजय सिंह यांना पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित (Monsoon Session) केले आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे.

हेही वाचा:

Back to top button