Chhatrapati Shivaji Maharaj : ‘वेड’नंतर जेनेलिया आणतेय ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्यावर चित्रपट | पुढारी

Chhatrapati Shivaji Maharaj : 'वेड'नंतर जेनेलिया आणतेय 'छत्रपती शिवाजी महाराज' यांच्यावर चित्रपट

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिट वेड चित्रपटानंतर जेनेलिया डिसुझा-देशमुख हिने ‘छत्रपती शिवाजी’ चित्रपटाची पुष्टी केली आहे. एका मुलाखतीदरम्यान, छत्रपति शिवाजी महाराज यांच्यावर ट्रिलॉजी चित्रपट आणण्याविषयी बातचीत केली. (Chhatrapati Shivaji ) रितेश देशमुखने २०२० मध्ये छत्रपती शिवाजी महाराज ट्रिलॉजी आणण्याचा विचार केसा होता. जेनेलिया म्हणाली, हा चित्रपट येणार आहे. पण, कोणतीही घाई नाही. हा चित्रपट रितेश देशमुखच्या मनाजवळचा आहे. या प्रोजेक्टसाठी तो आपला जीव ओतेल.’ (Chhatrapati Shivaji)

नागराज मंजुळे करणार दिग्दर्शन 

२०२० मध्ये रितेश देशमुख, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट आणण्याचा विचार केला होता. चित्रपट प्रोडक्शन हाऊस ‘मुंबई फिल्म कंपनी’ बॅनर अंतर्गत बनवला जाईल. १९ फेब्रुवारी, २०२० रोजी रितेशने ट्विट करून ही माहिती दिली होती.

अक्षय कुमारदेखील आणत आहे चित्रपट 

सध्या शिवाजी महाराज यांच्या जवनावर आधारित एख चित्रपट अक्षय कुमार आणत आहे. अश्रय कुमार या चित्रपटात मुख्य भूमिक्त आहे. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ असे चित्रपटाचे नाव आहे. महेश मांजरेकर या चित्रपटाचे दिर्ग्दशन करणार आहेत. आता चित्रपटाच्या माध्यमातून अक्षय मराठी इंडस्ट्रीत पाऊल ठेवत आहे.

Back to top button