पानशेतसह चार धरणांत वाढला साठा | पुढारी

पानशेतसह चार धरणांत वाढला साठा

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : धरणक्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे पानशेतसह खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. बुधवारी (दि. 19) सायंकाळी पाच वाजता धरणसाखळीत 11.24 टीएमसी म्हणजेच 38.55 टक्के पाणीसाठा झाला होता. मंगळवारी सायंकाळी पाच वाजता धरणसाखळीत 10.9 टीएमसी पाणी होते. धरणसाखळीची पाणीसाठवण क्षमता 29.15 टीएमसी आहे. शंभर टक्के पाणीसाठा होण्यासाठी जोरदार पावसाची गरज आहे.

रायगड जिल्ह्यालगतच्या परिसरात संततधार पाऊस सुरू आहे, तर धरणमाथ्याच्या परिसरात अधूनमधून सरी कोसळत आहेत. त्यामुळे नद्या, ओढे-नाल्यांतून चारही धरणांत पाण्याची आवक सुरू आहे. बुधवारी सायंकाळी पाच वाजता पानशेत धरणात 40.70 टक्के, वरसगावमध्ये 39.25, टेमघरमध्ये 24.80 व खडकवासला धरणात 48.31 टक्के साठा झाला होता. याच दिवशी सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या टेमघर येथे 25 मिमी, तर पानशेत येथे 16, वरसगाव येथे 14 व खडकवासला येथे 6 मिमी पाऊस पडला.

हेही वाचा :

तिजोरीच्या चाव्या अजित पवारांकडे आल्याने जनतेला मदत होईल : उद्धव ठाकरे

पिंपरी : महापालिकेचे 470 कोटी  राज्य शासनाच्या तिजोरीत

Back to top button