Global Warming : जपान ते अमेरिका, जगाची उकाड्याने काहिली; अनेक शहरात उच्चांकी तापमानाने विक्रम मोडले; जंगलांमध्ये वणवा | पुढारी

Global Warming : जपान ते अमेरिका, जगाची उकाड्याने काहिली; अनेक शहरात उच्चांकी तापमानाने विक्रम मोडले; जंगलांमध्ये वणवा

पुढारी ऑनलाइन डेस्क : Global Warming : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी सध्या संपूर्ण भारत व्यापला आहे. त्यामुळे भारतात सध्या कुठे पूर तर कुठे दुष्काळ अशी परिस्थिती आहे. मात्र, उर्वरित सर्व जग सध्या ग्लोबल वार्मिंगचा सामना करत असून जपान ते अमेरिका जगाची उकाड्याने काहिली होत आहे. तर प्रचंड वाढलेल्या तापमानामुळे अनेक जंगलांमध्ये वणवा पेटला आहे. पृथ्वीवरील सर्वात उष्ण ठिकाण म्हणून ओळखले जाणारे ठिकाण कॅलिफोर्नियातील डेथ व्हॅली गेल्या 110 वर्षातील सर्वोच्च तापमानाचा विक्रम मागे टाकेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. नॅशनल वेदर सर्व्हिसने 131F इतक्या उच्च तापमानाचा अंदाज वर्तवला आहे.

संपूर्ण जग सध्या जलवायू परिवर्तनाचा सामना करत आहेत. दिवसेंदिवस याचा वेग आणि तीव्रता वाढत आहेत. परिणामी सध्या संपूर्ण जग ‘ग्लोबल वॉर्मिंग’ ने त्रस्त झाले आहे. विशेष म्हणजे पूर्वेकडे जपान तर पश्चिमेकडे अमेरिकापर्यंत सर्वच देशांमध्ये तापमान वाढीचे नवे विक्रम नोंदवले जात आहे. विशेष करून अमेरिकेत तर शनिवारी हवामान विभागाने तापमान वाढीचे भीतीदायक अनुमान जारी केले आहेत. अमर उजाला ने याची माहिती दिली आहे. पाहूया भारतासह जपान ते अमेरिका पर्यंतची परिस्थिती…

Global Warming : आशिया खंडातील परिस्थिती

भारताच्या पूर्वेकडे किंवा जगातील सर्वात पूर्वेकडील देश जपानमध्ये तापमान रविवार ते सोमवार दरम्यान 38 ते 39 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याचा अनुमान आहे. तर हवामान विभागाच्या माहितीनुसार, यावर्षीच्या उन्हाळ्यात मागील सर्व विक्रम मोडले जाऊ शकतात. तर भारतीय उपखंडात मात्र याच्या उलट परिस्थिती आहे. मान्सूनने काही ठिकाणी रौद्र रूप धारण केले आहे. तर काही भागात मान्सूनने पाठ फिरवली आहे.

परिणामी भारतात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती तर अनेक ठिकाणी पावसाची प्रतीक्षा आहे. तर उत्तर भारतात आलेल्या पूरामुळे जवळपास 90 लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. तर देशातील अनेक शहरातील नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. मात्र, भारतात उन्हाळा संपला आहे आणि नैऋत्य मान्सूनने संपूर्ण भारत व्यापला आहे. त्यामुळे वातावरण कुठे थंड तर कुठे समसीतोष्ण आहे.

Global Warming : आफ्रिकेतील परिस्थिती

उत्तरी आफ्रिकेतील मोरक्को येथे उष्णतेने नवीन विक्रम स्थापित केले जात आहे. शनिवार-रविवार या दोन दिवसात येथील अनेक प्रांतात तापमान 47 अंश सेल्सियसच्या पार गेले आहे. या वाढलेल्या तापमानामुळे सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. कारण मोरक्कोमध्ये ऑगस्ट दरम्यान 47 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान नोंदवले जात असते. मात्र, यावेळी हे तापमान जून जुलैमध्येच नोंदवले गेले आहे. परिणामी वैज्ञानिकांना चिंता लागली आहे की आफ्रिकेतील देशांना येणाऱ्या काळात जून-जुलैमध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.
आधीच पाण्याच्या कमतरतेचा सामना करत असलेले जॉर्डन उन्हाळ्याच्या मध्यभागी संकटात सापडले जेव्हा त्याच्या अजलॉन जंगलांना आग लागली. यामुळे ही आग विझवण्यासाठी जॉर्डन सरकारला 214 टन मौल्यवान पाणी वापरावे लागले. याशिवाय इराक, जिथे एवढी उष्णता नेहमीच असते, तिथेही टायग्रिस नदी कोरडी पडल्याने पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. 50 अंश सेल्सिअस तापमानात इराकमधील परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे.

Global Warming
Global Warming

Global Warming : अमेरिका महाद्वीपातील परिस्थिती

अमेरिकेतील कॅलिफोर्निया ते टेक्सासपर्यंतची जनता भीषण उकाड्याने हैराण झाली आहे. या ठिकाणी गेल्या 16 दिवसांपासून भयानक उकाडा जाणवत आहे. तर अमेरिकेच्या हवामान विभागाने येणाऱ्या पुढील काही दिवसात आणखी भयानक उष्णतावाढीचा हाय अलर्ट जारी केला आहे. अमेरिकेतील संपूर्ण दक्षिण-पश्चिमेत लू अतिशय भयावह पातळीपर्यंत पोहोचण्याची चेतावनी देण्यात आली आहे. अमेरिकेतील एक तृतियांश जनता जवळपास 11 कोटी लोक या उकाड्याने प्रभावित झाले आहेत.

कॅलिफोर्नियामधील डेथ व्हॅली, जगातील सर्वात उष्ण ठिकाणांपैकी एक, 54 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. येथे दिवसभरात तापमानाने ४८ अंशांचा आकडा गाठला आहे. त्याच वेळी, लास वेगास आणि नवाडा सारख्या ठिकाणी काही दिवस तापमान 47 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते.

कॅनडामध्ये, यूएस उत्तरेमध्ये, सरकार म्हणते की सरासरीपेक्षा जास्त तापमान जंगलातील आगीला उत्तेजन देत आहे ज्याने यूएसचा काही भाग धुराच्या लोटात व्यापला आहे. या आगीमुळे आतापर्यंत सुमारे अडीच कोटी एकर जमीन जळून खाक झाली आहे. त्याचबरोबर उष्णता वाढल्याने अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

Global Warming : युरोपातील परिस्थिती

ग्लोबल वॉर्मिंगमुळे संपूर्ण युरोपमध्ये देखील अमेरिकेप्रमाणेच परिस्थिती आहे. इटलीत येणाऱ्या आठवड्यात तापमान नवीन ऐतिहासिक विक्रम नोंदवतील असा अनुमान आहे. इटलीच्या स्वास्थ मंत्रालयाने रोम, बोलोग्ना आणि प्लोरेंससह 16 शहरांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने लोकांना सांगितले आहे की आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक उकाड्यासाठी तयार राहा. रोममध्ये सोमवारी तापमान 40 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची तर मंगळवारपर्यंत तापमान 43 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याचा अनुमान आहे. यापूर्वी रोममध्ये अधिकतर तापमान 40.5 अंश सेल्सिअस पर्यंत नोंदवण्यात आले होते. 2007 मध्ये रोममध्ये तापमान 40.5 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते.

इटलीशिवाय युरोपच्या सिसिली आणि सार्दिनिया द्वीपचे तापमान 48 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. युरोपमधील उष्णतेचा हा सर्वात उच्च विक्रम असू शकतो. तर ग्रीसच्या पर्यटन केंद्रांपैकी एक एथेंस एक्रोपोलिस प्रचंड उकाड्यामुळे आज रविवारी सलग तिसऱ्या दिवशी देखील बंद ठेवण्यात आले आहे.

फ्रान्समध्ये प्रंचड उष्णतेमुळे दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम कृषि क्षेत्रावर होत आहे. फ्रान्सचे कृषी मंत्री मार्क फेसनेउ यांनाही तयारीच्या अभावामुळे लोकांच्या निषेधाचा सामना करावा लागत आहे. फ्रान्समध्ये या वर्षीचा जून हा देशाच्या इतिहासातील दुसरा सर्वात उष्ण जून होता. मंगळवारपासून फ्रान्समध्ये तापमानात पुन्हा वाढ होणार असून, पूर्वीचे सर्व विक्रम मोडीत निघणार असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.

युरोपातील आणखी एका मोठ्या देश स्पेनमध्ये उष्णतेचा प्रकोप सुरूच आहे. येथे सोमवार ते बुधवार उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे तापमान सतत ४० अंश सेल्सिअसच्या वर राहील. कॅनरी बेटे आणि दक्षिणेकडील अंडालुसियामध्ये परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा :

राज्यात गुरुवारपर्यंत उकाडा, हलका पाऊसही

पिंपरी-चिंचवड शहराचे तापमान घटले, उकाडा कायम

Back to top button