सातारा : धरणे अजूनही निम्म्यावर : पाणीसाठा वाढता वाढेना | पुढारी

सातारा : धरणे अजूनही निम्म्यावर : पाणीसाठा वाढता वाढेना

सातारा, पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर ओसरला असल्याने कोयना, उरमोडी, कण्हेर, धोम, धोम बलकवडी, तारळीसह अन्य छोट्या धरणात पाणीसाठा वाढलेला नाही. जिल्ह्यातील धरणात 52.41 टक्केच पाणीसाठा असल्याने ऑगस्टपर्यंत धरणे भरण्याची शक्यता धूसर बनत चालली असून शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.

जूनच्या शेवटच्या आठवड्यात व जुलैच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने हजेरी लावली. मात्र गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पावसाने पूर्णत: उघडीप दिली आहे. त्यामुळे धरण क्षेत्रात येणार्‍या पाण्याचा ओघ कमी झाला आहे. कोयना धरणात गुरुवारची (दि. 13) पाणीपातळी 628.93 मीटर असून धरणात 18.44 टक्के पाणी आहे. धरणात 3 हजार 564 क्युसेक्स पाण्याची आवक होत असून, गतवर्षी धरणात 33.33 टक्के पाणी होते. धोम धरणात आजची पाणी पातळी 734.04 मीटर असून धरणात 25.15 टक्के पाणी आहे. धरणात 478 क्युसेक्स पाण्याची आवक होत असून गतवर्षी धरणात पाणी 35.67 टक्के होते. धोम बलकवडी धरणात 43.18 टक्के पाणी आहे. गतवर्षी धरणात पाणी 50.00 टक्के होते. कण्हेर धरणात 20.44 टक्के पाणी आहे. गतवर्षी धरणात पाणी 33.37 टक्के होते. उरमोडी धरणात 33.26 टक्के पाणी असून 421 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. गतवर्षी 73.37 पाणी टक्के होते. तारळी धरणात 54.45 टक्के पाणी आहे. गतवर्षी 57.88 पाणी टक्के होते.

मध्यम प्रकल्प येरळवाडी धरणात 1.45 टक्के पाणी आहे. गतवर्षी 17.39 टक्के पाणी होते. नेर धरणात 20.19 टक्के पाणी आहे. गतवर्षी 23.08 टक्के पाणी होते. राणंद धरणात 8.85 टक्के पाणी आहे. गतवर्षी 30.97 टक्के पाणी होते. आंधळी धरणात 12.98 टक्के पाणी आहे. गतवर्षी धरणात 22.14 टक्के पाणी होते. नागेवाडी धरणात आजची पाणी पातळी 838.20 मीटर असून धरणात 26.67 टक्के पाणी आहे. गतवर्षी धरणात 19.05 टक्के पाणी होते. मोरणा धरणात 62.31 टक्के पाणी आहे. गतवर्षी धरणात 69.38 टक्के पाणी होते.

उत्तरमांड धरणात आजची पाणी पातळी 676.36 मीटर असून धरणात 27.91 टक्के पाणी आहे. गतवर्षी धरणात 44.19 टक्के पाणी होते. महू धरणात 68.81 टक्के पाणी आहे. गतवर्षी 43.85 टक्के पाणी होते. हातगेघर धरणात 18.60 टक्के पाणी आहे. गतवर्षी धरणात 24.64 टक्के पाणी होते. वांग मराठवाडी धरणात 13.35 टक्के पाणी आहे. गतवर्षी धरणात 24.26 टक्के पाणी होते.

Back to top button