पुणे : अवैध गावठी दारूअड्डा उद्ध्वस्त; एकवीस जणांना अटक | पुढारी

पुणे : अवैध गावठी दारूअड्डा उद्ध्वस्त; एकवीस जणांना अटक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : लोणीकाळभोर परिसरात अवैध गावठी दारू तयार करणार्‍या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह रजपूत यांच्या पथकाने छापा टाकून गावठी दारूसह 23 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तब्बल 21 जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

लोणीकाळभोरजवळील बल्लाळ वस्तीत येथील शेखर काळभोर यांच्या शेतात अवैध गावठी दारू तयार करण्यात येत असल्याची माहिती अधीक्षकांना मिळाली होती. त्यानुसार भरारी पथकाला सोबत घेऊन बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास त्यांनी छापा टाकला. या वेळी तेथून दारू बनविण्यासाठी लागणारे 12 हजार 300 लिटर रसायन, 1 हजार 295 लिटर गावठी दारू, विविध ब—ॅण्डच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या, वाहने यासह 23 लाख 5 हजार 590 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी 21 जणांना अटक करण्यात आली असून, त्यांना 10 पर्यंत पोलिस कोठीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. ही कारवाई राज्य उत्पादक शुल्क पुणे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे विभागाचे निरीक्षक संजय कोल्हे, निरीक्षक अशोक कोल्हे, राजू वाघ, कुमार डावरे, बाळासाहेब नेवसे यांनी केली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातभट्टी निर्मूलन मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार संपूर्ण जिल्ह्यात कारवाई करण्यात येत आहे. आपल्या परिसरात कोणी गावठी दारूनिर्मिती करून विक्री करत असेल, तर त्यांनी माहिती द्यावी. त्यांचे नाव गोपनीय ठेवून कारवाई केली जाईल.

– चरणसिंह राजपुत, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, पुणे.

हेही वाचा

पुणे : घरफोड्यांत 11 लाखांचा ऐवज लंपास

कोल्हापूर : ‘उच्च शिक्षण सहसंचालक’चा कारभार पुन्हा चव्हाट्यावर!

ड्रायपोर्ट सलगरे येथेच; जागेचा प्रश्न मिटला

Back to top button