ड्रायपोर्ट सलगरे येथेच; जागेचा प्रश्न मिटला

ड्रायपोर्ट सलगरे येथेच; जागेचा प्रश्न मिटला
Published on
Updated on

सांगली, पुढारी वृत्तसेवा : सलगरे (ता. मिरज) येथे मॉडेल लॉजिस्टिक पार्क (ड्रायपोर्ट) होणार आहे. ड्रायपोर्टसाठी जागेचा प्रश्न मिटला आहे. सलगरे येथील 350 एकर सरकारी जागा उद्योग खात्याकडे हस्तांतर होणाार आहे. उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार संजय पाटील आणि मंत्रालयीन सचिव व वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत मुंबईतील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मुक्तागिरी येथे झालेल्या बैठकीला खासदार संजय पाटील, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन शर्मा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी पाटील, महसूल उपसचिव श्रीराम यादव, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, सांगली एमआयडीसीच्या बिरजे व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. ड्रायपोर्ट उभारल्यास शेतकर्‍यांच्या मालाला मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. वाहतूक व्यवस्था गतिमान झाल्यामुळे चांगल्या दर्जाचा व वेळेत शेतीमाल बाजारपेठेत पोहोचेल. शेती व शेतकर्‍यांठी हे अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे.

सलगरे येथील हा ड्रायपोर्ट प्रस्तावित ग्रीन फील्ड एक्स्प्रेस वे आणि लागून मिरज-पंढरपूर रेल्वे मार्गापासून जवळ आहे. त्यामुळे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी सांगली लोकसभा मतदारसंघात माझ्या आग्रही मागणीवरून ड्रायपोर्ट मंजूर केले. ग्रीन फील्ड हायवेलगत ड्रायपोर्ट झाल्यामुळे वाहतुकीची कनेक्टिव्हिटी वाढवून बाजारपेठेला चालना मिळणार आहे. गडकरी यांनी दोन मोठी विकासाची कामे मंजूर केल्यामुळे सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बेळगाव आणि कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी विकासाला चालना मिळणार आहे, असे खासदार पाटील यांनी सांगितले.

सलगरे येथे ड्रायपोर्टसाठी केंद्रातील सर्व पूर्तता पूर्ण कराव्यात यासाठी राज्यस्तरावरून कार्यवाही होणे गरजेचे होते. त्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी केली होती. त्या अनुषंगाने गुरूवारी बैठक झाली. ड्रायपोर्ट होण्यासाठी सर्वात मोठे पाऊल उद्योग मंत्री सामंत यांनी टाकले आहे. जमीन हस्तांतरणाचा मोठा निर्णय झाला आहे, अशी माहिती खासदार संजय पाटील यांनी दिली.

शेतकर्‍यांच्या प्रगतीसाठी हे ड्रायपोर्ट अतिशय महत्वाचे आहे. ड्रायपोर्टचे स्वप्न सत्यात उतरत आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातील जनतेने दिलेल्या आशीर्वादाची परतफेड करण्यासाठी मी एक निमित्त झालो आहे. सलगरे येथे ड्रायपोर्ट पूर्ण होईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असे खासदार पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news