पुणे-दौंड-बारामती डेमू रद्द
पुणे : पुण्यातून सकाळी सुटणारी पुणे-दौंड-बारामती डेमू गाडी रद्द करण्यात आली. त्यामुळे सकाळी नियमितपणे प्रवास करणार्या प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. निजामाबाद-पुणे गाडीला दहा तास उशीर झाल्यामुळे ही गाडी रद्द केल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
निजामाबाद-पुणे गाडी पुण्यात आल्यानंतर तिचा रेक सकाळी पुणे-दौंड-बारामती डेमूसाठी वापरला जातो. पण, पुण्यात येणार्या निजामाबाद-पुणे गाडीला तब्बल दहा तास उशीर झाला. त्यामुळे सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी सुटणारी पुणे-बारामती डेमू रद्द करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप झाला.
हेही वाचा
Maharashtra Political Crisis : बापाचा नाद करायचा नाय; खासदार सुप्रिया सुळे यांचा इशारा