NCP crisis in Maharashtra : काकावर पुतण्या भारी; अजित पवारांकडे 33, तर शरद पवारांकडे 15 आमदारांची उपस्थिती | पुढारी

NCP crisis in Maharashtra : काकावर पुतण्या भारी; अजित पवारांकडे 33, तर शरद पवारांकडे 15 आमदारांची उपस्थिती

मुंबई;  पुढारी वृत्तसेवा :  अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँगेसच्या नेत्यांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट किती मोठी आहे ते आता स्पष्ट झाले आहे. अजित पवारांनी घेतलेल्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे 32 आमदार उपस्थित होते. तर, शरद पवारांच्या मेळाव्याला 15 आमदार पोहोचले. त्यामुळे पहिल्या शक्तिप्रदर्शनात अजित पवारांची सरशी झाली आहे. तीन आमदारांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला असला तरी ते बैठकीला आलेच नाहीत तर दोन आमदार तटस्थ आहेत.

या पार्श्वभूमीवर बुधवारी दोन्ही गटांनी स्वतंत्र बैठकीचे आयोजन करून आमदारांची चाचपणी केली. शरद पवार यांच्या गटाची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पार पडली. या बैठकीसाठी खासदार, आमदार यांना निमंत्रित करण्यात आले होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेले 9 आमदार वगळता सर्व आमदार सोबत असल्याचा दावा केला होता. मात्र, हा दावा फोल ठरला. या बैठकीला विधानसभेतील 18, विधान परिषदेचे 3 आमदार, लोकसभेचे तीन खासदार तर दोन राज्यसभा खासदार उपस्थित होते. मकरंद पाटील, दौलत दरोडा आणि चंद्रकांत नवघरे यांनी शरद पवारांना पाठिंबा दिला असला तरी ते बैठकीला आले नाहीत. त्यामुळे त्यांच्याबद्दल संभ्रम कायम आहे.

अजित पवार यांच्या गटाची बैठक वांद्रे येथील मुंबई एजुकेशन ट्रस्टच्या सभागृहात पार पडली. या बैठकीला विधानसभेतील 33 आमदार उपस्थित होते. तसेच विधान परिषदेतील रामराजे नाईक निंबाळकर,अमोल मिटकरी, विक्रम काळे हे आमदार अजित पवारांच्या सोबत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे राष्ट्रवादीतील शक्तिप्रदर्शनात अजित पवार काकांवर भारी दिसले.

शरद पवार यांच्याकडील आमदार

जयंत पाटील (इस्लामपूर), जितेंद्र आव्हाड (मुंब्रा- कळवा), अनिल देशमुख (काटोल), बाळासाहेब पाटील (उत्तर कराड), राजेश टोपे (घनसावंगी), राजेंद्र शिंगणे (सिंदखेडराजा), अशोक पवार (शिरूर), प्राजक्त तनपुरे (राहुरी), चेतन तुपे (हडपसर), रोहित पवार (कर्जत जामखेड), सुमन पाटील (तासगाव कवठेमहांकाळ), सुनील भुसारा (विक्रमगड), किरण लहामटे (अकोले), संदीप क्षीरसागर (बीड), मानसिंग नाईक (शिराळा)

विधान परिषद सदस्य : एकनाथ खडसे, बाबाजान दुराणी, शशिकांत शिंदे

खासदार : श्रीनिवास पाटील, सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, वंदना चव्हाण, फौजिया खान

मकरंद पाटील, चंद्रकांत नवघरे आणि दरोडा यांनी शरद पवारांना पाठिंबा दिला असला तरी बैठकीला उपस्थित नव्हते.

अजित पवार यांच्याकडील आमदार

छगन भुजबळ (येवला), दिलीप वळसे पाटील (आंबेगाव), हसन मुश्रीफ (कागल), धनंजय मुंडे (परळी) आदिती तटकरे (श्रीवर्धन), धर्मरावबाबा आत्राम (अहेरी), संजय बनसोडे (उदगीर), अनिल पाटील (अमळनेर), बाळासाहेब आजबे (आष्टी), राजू कारेमोरे (तुमसर), आशुतोष काळे (कोपरगाव), माणिकराव कोकाटे (सिन्नर), मनोहर चंद्रिकापुरे (अर्जुनी मोरगाव) दीपक चव्हाण (फलटण), संग्राम जगताप (अहमदनगर शहर), नरहरी झिरवाळ (दिंडोरी), सुनील टिंगरे (वडगाव शेरी), इंद्रनील नाईक (पुसद), शेखर निकम (चिपळूण), नितीन पवार (कळवण), बाळासाहेब पाटील (अहमदपूर),राजेश पाटील (चंदगड), दिलीप बनकर (निफाड), अण्णा बनसोडे (पिंपरी) अतुल बेनके (जुन्नर), दत्तात्रय भरणे (इंदापूर), यशवंत माने (मोहोळ), दिलीप मोहिते (खेड आळंदी), नीलेश लंके (पारनेर) बबनराव शिंदे (म्हाडा), सुनील शेळके (मावळ), प्रकाश सोळंके(माजलगाव) लोकसभा आणि राज्यसभा सदस्य : सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल
तटस्थ आमदार : नवाब मलिक आणि सरोज अहिरे.

Back to top button