पुण्यात मोटारवाहन कायद्यालाच केराची टोपली; स्कूल व्हॅनचालकांकडून वाहनाच्या अंतर्गत रचनेत सर्रास बदल | पुढारी

पुण्यात मोटारवाहन कायद्यालाच केराची टोपली; स्कूल व्हॅनचालकांकडून वाहनाच्या अंतर्गत रचनेत सर्रास बदल

प्रसाद जगताप
पुणे : प्रमाणापेक्षा जास्त शालेय मुलांची वाहतूक करता यावी, याकरिता पुण्यातील स्कूल व्हॅनचालकांनी शक्कल लढवत अंतर्गत आसनक्षमतेच्या रचनेत बदल केले आहेत. त्यांनी गाडी सोबत येणारी मूळ आसने काढून छोट्या आकाराची आसने आरटीओला न माहिती देताच परस्पर बसवली आहेत.  या प्रकाराकडे पुणे आरटीओचे दुर्लक्ष होत असून, स्कूल व्हॅनचालक मोटार वाहन कायद्यातील नियमांना केराची टोपली दाखवत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

स्कूल व्हॅनमध्ये कोंबा-कोंबी सुरूच

शहरात अनधिकृतरीत्या शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक जोमात सुरू आहे. त्यातच भर म्हणजे स्कूल व्हॅनचालक आसन क्षमतेपेक्षा अधिक मुले आपल्या स्कूल व्हॅनमध्ये कोंबत आहेत. नियमानुसार 7 लहान मुलांची वाहतूक करण्याचा नियम आहे. मात्र, एका व्हॅनमध्ये 15 ते 20 मुलांची वाहतूक करण्यात येत आहे. याकडे आरटीओ प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

अशी आहे स्थिती…

शहरातील एकूण शालेय वाहने : 6 हजार 606
 फिटनेस तपासणी झालेली वाहने : 5 हजार 71
 अद्याप ‘फिटनेस’ नसलेली वाहने : 15032
आमच्याकडून शालेय वाहतुकीच्या वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये 4 पथकांच्या माध्यमातून 70 शालेय वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. ही मोहीम सुरूच राहील. शालेय वाहनचालकांनी तातडीने फिटनेस तपासणी करावी.
– डॉ. अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

विद्यार्थी वाहतुकीसाठी

या गोष्टी आवश्यक
वाहनाला शालेय विद्यार्थी वाहतूक परवाना
वाहनाचा रंग पिवळा
वाहनात महिला सहायक
अंतर्गत आसनव्यवस्था चांगली असावी, आसनाच्या बाजूला हँडल
अग्निशामक उपकरण, आपत्कालीन दरवाजा
बसमध्ये उभे राहिल्यास पकडण्यासाठी हँडल
खिडकीच्या बाहेरील बाजूस आडवे लोखंडी बार
धोक्याचा इशारा देणारी
प्रकाश योजना व घंटी
 वाहनावर विद्यार्थ्यांचे चित्र
गाडीमध्ये बॅगसाठी जागा
प्रथमोपचार पेटी, बसमध्ये चढण्यासाठी खालची पायरी
फिटनेस तपासणी वेळेवर करावी
गाडीचा इन्शुरन्स (विमा)
आसनक्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी भरू नये
खासगी वाहनांमधून शालेय वाहतूक करू नये
हेही वाचा

Back to top button