Darshana Pawar Death Case : असा केला दर्शनाचा खून ! पोलिसांसमोर राहुलनी दिली धक्कादायक कबुली

Darshana Pawar Death Case : असा केला दर्शनाचा खून ! पोलिसांसमोर राहुलनी दिली धक्कादायक कबुली
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : लग्नाच्या कारणावरून झालेल्या वादावादीनंतर रागाच्या भरात दर्शनावर सुरुवातीला कंपासमधील कटर ब्लेडने तीन ते चार वेळा शरीरावर वार केले. या वेळी कटरचा वार गळ्याला लागल्याने दर्शनाच्या गळ्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. त्यानंतर दगडाने मारहाण करीत तिचा खून केल्याची कबुली आरोपी राहुल हंडोरे याने सोमवारी पोलिसांना दिली. मात्र, हे सगळे माझ्या हातून अनावधानाने घडले, असे राहुलने चौकशीदरम्यान सांगितल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

एमपीएससीच्या परीक्षांसाठी आम्ही दोघे एकत्र अभ्यास करीत होतो. यादरम्यान मी तिला प्रपोजही केले होते. एमपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी तिला मदत केली. एमपीएससी परीक्षा पास झाल्यावर दर्शनाने राहुलसोबत लग्नाला नकार दिला. याचाच राग आल्याने मी तिला संपवायचे ठरविल्याचे राहुलने चौकशीदरम्यान सांगितले.

राजगड येथे ट्रेकिंगसाठी दुचाकीवरून दोघे आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. मात्र, काही वेळांनंतर राहुल हा एकटाच वरून खाली येताना पाहायला मिळत आहे. सीसीटीव्हीबाबत देखील पोलिसांकडून अधिक माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याने खून कसा केला, याची कबुली दिली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

18 जून रोजी दर्शना पवार हिचा राजगडाच्या पायथ्याशी मृतदेह सापडला होता. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर दर्शनाची ओळख पटली होती. तसेच, ती मित्र राहुल हंडोरेसोबत राजगडावर ट्रेकिंगसाठी गेल्याचे समोर आले होते. मात्र, राहुलही 12 जूनपासून बेपत्ता होता. त्यामुळे पोलिसांचा राहुलवर संशय बळावला होता. बेपत्ता राहुलला शोधण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या नंबरवरून त्याच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर अखेर 21 जून रोजी रात्री उशिरा मुंबईत अटक करण्यात आली होती.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news