पिंपळनेर : ग्रामविकास अधिकाऱ्याचा सुपुत्र झाला क्लास वन अधिकारी | पुढारी

पिंपळनेर : ग्रामविकास अधिकाऱ्याचा सुपुत्र झाला क्लास वन अधिकारी

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
येथील ग्रामविकास अधिकारी डी. डी. चौरे व जयश्री चौरे यांचा मुलगा कल्पेश उर्फ बंटी हा लोकसेवा आयोगाने घेतलेल्या सहाय्यक नगर रचनाकार वर्ग १ या पदाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाला आहे.

कल्पेश चौरे याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा नं. १, पिंपळनेर माध्यमिक शिक्षण दहावी (२०१४) पर्यंत कर्म. आ. मा. पाटील विद्यालयात झाले आहे. उच्य माध्यमिक शिक्षण अकरावी ते बारावी (२०१६) के. टी. एच. एम. कॉलेज नाशिक येथे झाले. तर पदवी शिक्षण बीई सिव्हिल (जुन-२०२१) झाल्यानंतर सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे पूर्ण करुन (२०२२) एम. पी. एस. सी परीक्षेत त्याने परिश्रम घेतले. या परिश्रमाचे फळ म्हणून जानेवारी-२०२२ रोजी ४३१ उमेदवारांमधून तो मुलाखतीसाठी पात्र झाला. मुलाखतीनंतर १३८ उमेदवारांची निवड झाली. त्यात कल्पेश चौरे अनुसूचित जमाती प्रवर्गातून २ जून २०२३ रोजी सहाय्यक नगर रचनाकारपदी निवड झाली आहे.

या यशाबद्दल त्याचे साक्री पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोनवणे, पंचायत समिती पेठ गटविकास अधिकारी जे. टी. सूर्यवंशी, विस्तार अधिकारी हर्षल महंत, जे. पी. खाडे, अमृत महाले, भुमी अभिलेख कांतीलाल चौधरी, रिखबशेठ जैन, ग्रामसेवक संघटना, साक्री, धुळे, तालुका मराठी पत्रकार संघाचे सदस्य अंबादास बेनुस्कर, पिंपळनेर पत्रकार संघटनेचे राजेंद्र गवळी, विशाल गांगुर्डे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सुभाष जगताप, सरपंच देविदास सोनवणे, उपसरपंच विजय गांगुर्डे, सभापती संजय ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते बापू सहादू खैरनार, ग्राम पंचायत सदस्य योगेश बधान, प्रमोद गांगुडेॅ, ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांनी कल्पेशवर कौतूकाचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा:

Back to top button