Bastar Movie : 'द केरल स्टोरी' नंतर विपुल शाह आणणार 'बस्तर' | पुढारी

Bastar Movie : 'द केरल स्टोरी' नंतर विपुल शाह आणणार 'बस्तर'

पुढारी ऑनलाईन डेस्क : द केरल स्टोरीनंतर विपुल अमृतलाल शाह यांनी आगामी चित्रपट बस्तरची घोषणा केलीय. (Bastar Movie) या चित्रपटाचे पोस्टर रीलीज करण्यात आले आहे. सध्या निर्मात्यांनी कलाकार कोण असतील, याबाबतची माहिती जाहिर केलेले नाही. पण रिलीज डेटचा खुलासा नक्की केलाय. पुढील वर्षी ईदच्या निमित्ताने चित्रपट रिलीज होईल. (Bastar Movie)

विपुल अमृतलाल शाह ‘आंखे’, हॉलिडे, फोर्स, कमांडो, ‘वक्त’, ‘नमस्ते लंडन’, ‘सिंग इज किंग’, ‘द केरळ स्टोरी’, सनक, ब्लॉकबस्टर वेब शो ह्युमन आर यांसारख्या चित्रपटांसह त्यांच्या फिल्मोग्राफीसाठी प्रसिद्ध आहेत. . बस्तर चित्रपटाची निर्मिती सनशाइन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली लास्ट मंक मीडियाच्या सहकार्याने होत आहे.

‘बस्तर’ची कथा पाहायला मिळणार

आता हा चित्रपट कधी येणार, याची घोषणा केली आहे. ‘द केरळ स्टोरी’ची ही प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता जोडी पुन्हा एकदा एकत्र येत आहे. निर्मात्यांनी त्यांच्या दुसऱ्या चित्रपटाची घोषणा पोस्टरसह केली. या पोस्टमध्ये आपण पाहू शकतो की, शांततापूर्ण वातावरणात चित्रपटाचे शीर्षक लाल रंगात दिसत आहे. हा चित्रपट ५ एप्रिल, २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची स्टारकास्टही सध्या गुप्त ठेवण्यात आले आहे.

चित्रपटाचे शीर्षक आणि घोषणा पोस्टर देखील याचीच साक्ष देतात, ज्यावर लिहिले आहे की, “देशाला धक्का देणारे आणखी एक सत्य.” शीर्षक घोषणा पोस्टरमध्ये असेही लिहिले आहे की, “तुफान आणेल असे दडलेले सत्य.

Back to top button