IND vs WI : रिंकू सिंगची टीम इंडियाच्‍या टी-20 संघात होणार ‘एन्ट्री’?

IND vs WI :  रिंकू सिंगची टीम इंडियाच्‍या टी-20 संघात होणार ‘एन्ट्री’?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी आणि वन-डे संघांची घोषणा झाली आहे. मात्र,पाच सामन्यांच्या T20 मालिकेसाठी संघाची निवड अद्याप हाेणे बाकी आहे. आयपीएल 2023 मध्ये आपल्या धमाकेदार फलंदाजीने सर्वांनाच मंत्रमुग्‍ध करणार्‍या रिंकू सिंगची ( Rinku Singh ) टीम इंडियाच्‍या T20 संघात निवड होण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे.

नुकत्‍याच संपलेल्‍या इंडियन प्रीमियर लीगच्‍या ( आयपीएल) हंगामात आपल्‍या धमाकेदार फलंदाजीमुळे रिंगू सिंग प्रसिद्धीझोतात आला आहे. आयपीएलमधील साखळी सामन्‍यात त्‍याने शेवटच्या षटकात पाच षटकार फटकावत केकेआरला अविश्‍वसनीय विजय मिळवून दिला होता.

एका रिपोर्टनुसार, भारतीय निवडकर्त्यांनी रिंकूला आयपीएल 2023 मधील दमदार कामगिरीसाठी बक्षीस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्‍यामुळे रिंकूची विंडीज दौऱ्यासाठी T20I संघात निवड होण्याची शक्यता व्‍यक्‍त होत आहे. रिंकूने 'आयपीएल'मधील १४ सामन्यांत ५९.२५ सरासरीने आणि १४९.५२ च्या स्ट्राइक रेटने ४७४ धावा केल्या आहेत. त्‍याच्‍या या कामगिरीची दखल घेत त्‍याचा टीम इंडियाच्‍या T20 संघात समावेश हाेण्‍याची शक्‍यता सूत्रांनी व्‍यक्‍त केली आहे.

उमेश यादवचा पूर्णपणे वगळलेले नाही

'बीसीसीआय'च्या सूत्रांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना स्‍पष्‍ट केले की, "टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीने त्रस्त आहे. तो 'एनसीए'मध्ये सराव करत आहे. उमेशला निवडकर्त्यांनी वगळले नाही. तो पूर्णपणे तंदुरुस्त नसल्‍याने त्‍याची संघात निवड करण्‍यात आलेली नाही."

पुजारासाठी दरवाजे कायमचे बंद नाहीत

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवडलेल्या कसोटी संघातून चेतेश्वर पुजारा याचा समावेश करण्‍यात आलेला नाही. 'बीसीसीआय'च्या सूत्रांनी स्‍पष्‍ट केले आहे की, पुजारा आणि उमेशसाठी टीम इंडियाचे दरवाजे कायमचे बंद झालेले नाहीत. कसोटी विश्‍वचषक अंतिम सामन्‍यापूर्वी १५ महिने संघाबाहेर असलेल्या अजिंक्य रहाणेला कसोटी संघाचा उपकर्णधार करण्‍यात आले आहे. याचा अर्थ टीम इंडियात कोणताही खेळाडू आपल्‍या कामगिरीनुसार पुनरागमन करू शकतो, हे स्‍पष्‍ट आहे. त्‍यामुळे वरिष्ठ खेळाडूसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद नाहीत."

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news