Srinivas Kulkarni| कोल्हापूरच्या सुपुत्राचा अमेरिकेत डंका; श्रीनिवास कुलकर्णी यांना खगोल शास्त्रातील ‘शॉ’ पुरस्कार | पुढारी

Srinivas Kulkarni| कोल्हापूरच्या सुपुत्राचा अमेरिकेत डंका; श्रीनिवास कुलकर्णी यांना खगोल शास्त्रातील 'शॉ' पुरस्कार

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारतीय वंशाचे महाराष्ट्राचे सुपुत्र आणि सध्या अमेरिकेत प्राध्यापक असलेले श्रीनिवास आर कुलकर्णी यांना खगोल शास्त्रातील शॉ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘शॉ’ हा अमेरिकेत विज्ञान क्षेत्रातील प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो.  श्रीनिवास कुलकर्णी हे (Srinivas Kulkarni) अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

Srinivas Kulkarni: ‘या’ संशोधसाठी पुरस्कार

मूळचे भारतीय वंशाचे, महाराष्ट्र सुपुत्र अमेरिकन श्रीनिवास आर. कुलकर्णी हे कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे भौतिकशास्त्र, गणित आणि खगोलशास्त्र या विभागांमध्ये प्राध्यापक आहेत. मिलिसेकंद पल्सर, गॅमा-रे बर्स्ट, सुपरनोव्हा आणि इतर परिवर्तनीय किंवा क्षणिक खगोलशास्त्रीय वस्तूंबद्दल कुलकर्णी यांच्या महत्त्वपूर्ण संशोधनामुळे त्यांना (Srinivas Kulkarni) अमेरिकेतील ‘शॉ’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

प्राध्यापक कुलकर्णी मूळ कोल्हापूरचे

कॅलटेकच्या भौतिकशास्त्र विभागावर पोस्ट केलेल्या त्यांच्या बायोनुसार, कुलकर्णी यांचा जन्म महाराष्ट्रातील ‘कुरुंदवाड’ (जि.कोल्हापूर) या गावात झाला. कर्नाटकातील हुबळी येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्लीमधून भौतिकशास्त्रात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यानंतर अमेरिकेतील बर्कले विद्यापीठातून त्यांनी पीएचडीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

१९८७ पासून ते कॅलिफोर्निया विद्यापीठात

ते (Srinivas Kulkarni)  2006 ते 2018 या काळात कॅलटेक ऑप्टिकल ऑब्झर्व्हेटरीचे संचालकही होते. १९८७ पासून ते कॅलिफोर्निया विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. कुलकर्णी यांनी अमेरिकेतील सॅन दिएगो येथील कॅलटेक ऑप्टिकल ऑब्जर्व्हेटरीजचे संचालक म्हणून २००६ ते २०१८ या काळात काम केले आहे.

Back to top button