राज्यातील 9 डेप्युटी आरटीओंच्या पदोन्नतीचा मार्ग झाला मोकळा, पिंपरी-चिंचवड आता स्वतंत्र आरटीओ कार्यालय | पुढारी

राज्यातील 9 डेप्युटी आरटीओंच्या पदोन्नतीचा मार्ग झाला मोकळा, पिंपरी-चिंचवड आता स्वतंत्र आरटीओ कार्यालय

पुणे, पुढारी वृत्तसेवा: उपप्रादेशिक परिवहन कार्यालये, प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये रूपांतरीत करण्यासंदर्भातील आदेश शासनाने शुक्रवारी (दि.23) जारी केला. त्यामुळे राज्यातील 9 उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांचा दर्जा आता वाढला आहे. परिणामी, दर्जा वाढलेल्या कार्यालयांचा प्रमुख (प्रादेशिक परिवहन अधिकारी) म्हणून काम करण्यासाठी आता 9 डेप्युटी आरटीओंच्या पदोन्नतीचा मार्ग सुध्दा मोकळा झाला आहे. राज्यशासनाने यासंदर्भातील शासन निर्णय शुक्रवारी जारी केला. परिवहन विभागातील अधिकार्‍यांना बर्‍याच दिवसांपासून या शासनन निर्णयाची प्रतिक्षा होती. हा निर्णय झाल्यामुळे आता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणजेच डेप्युटी आरटीओंना दिलासा मिळाला आहे.

पिंपरी-चिंचवड आता स्वतंत्र आरटीओ कार्यालय…

पुर्वी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अंतर्गत पिंपरी-चिंचवड, बारामती, अकलूज, सोलापूर ही पाच उपप्रादेशिक परिवहन कार्यालये होती. आता झालेल्या शासन निर्णयामुळे पुणे कार्यालयाच्या अंतर्गत आता फक्त बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालय असणार असून, पिंपरी-चिंचवड आणि सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे ही दोन्ही कार्यालये स्वंतत्र झाली आहेत. तर सोलापूर कार्यालयाच्या अंतर्गत अकलूज कार्यालयाचे कामकाज चालणार आहे.

ही आहेत दर्जा वाढलेली कार्यालये…

1) पिंपरी-चिंचवड
2) जळगाव
3) सोलापूर
4) अहमदनगर
5) वसई (जि.पालघर)
6) चंद्रपूर
7) अकोला
8) बोरिवली (मुंबई)
9) सातारा

पुणे आरटीओत लवकरच कारभार बदलणार….

पुणे आरटीओ कार्यालयात दोन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, एक प्रादेशिक परिवहन अधिकारी अशी प्रमुख पदे आहेत. मागील काही महिन्यांपुर्वी येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे नुकतेच निवृत्त झाले आहेत. त्यांचे पद सध्या रिक्त आहे. तर आता काही दिवसांत दुसरे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर देखील यांची बदली होणार आहे. तसेच, कार्यालय प्रमुख प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे देखील आगामी महिन्यात निवृत्त होणार आहेत. त्यामुळे पुणे आरटीओ कार्यालयाचा कारभार लवकरच बदलणार असून, नवीन अधिकारी कोण येणार? याची अनेकांना उत्सुकता आहे. तर पुणे आरटीओतील या जागांसाठी राज्यातून चढाओढ सुरू झाली आहे.

हेही वाचा:

राज्यातील 9 डेप्युटी आरटीओंच्या पदोन्नतीचा मार्ग झाला मोकळा, पिंपरी-चिंचवड आता स्वतंत्र आरटीओ कार्यालय

राज्यातील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीवर बंदी; शालेय शिक्षण विभागाचा जीआर

Monsoon Forecast : मान्सून विदर्भातून राज्यात सक्रिय; बंगालच्या उपसागरातून दुसऱ्या शाखेची एन्ट्री

 

Back to top button