Monsoon Forecast : मान्सून विदर्भातून राज्यात सक्रिय; बंगालच्या उपसागरातून दुसऱ्या शाखेची एन्ट्री | पुढारी

Monsoon Forecast : मान्सून विदर्भातून राज्यात सक्रिय; बंगालच्या उपसागरातून दुसऱ्या शाखेची एन्ट्री

पुणे; पुढारी वृत्तसेवा : यंदा मान्सून बंगालच्या उपसागरातून दुसऱ्या शाखेमार्फत आंध्रप्रदेश, छत्तीसगड मार्गे विदर्भातील गोंदिया, गडचिरोलीत शुक्रवारी दुपारी दाखल झाला असून तो 24 तासात वेगाने मुबंई, मध्यमहाराष्ट्र गाठेल आसा अंदाज आहे. दरवर्षी मान्सून कोकणातून अवघ्या राज्यात येतो. मुबंई, पुणे नंतर तो उर्वरित राज्यात येतो.

मान्सूनची पहिली शाखा ही यंदा कोकणात रत्नागिरीतच 11 जून पासून अडखळत आहे. या शाखेमागून बंगालच्या उपसागराकडून पश्चिम बंगाल आणि बिहारकडे दुसरी शाखा जाते. या दोन शाखा देशाला पाऊस देतात. उत्तर भारत आणि हिमालयात एक होतात. मात्र, पहिली शाखा रत्नागिरीत अडखळल्याने मान्सून दुसऱ्या शाखेमार्फत विदर्भात दाखल झाला.

यंदा सर्वात आधी विदर्भ

दरवर्षी राज्यात अरबी सुमद्राकडून मान्सून येतो. केरळमधून तो तळकोकणात येतो. यात विदर्भात शेवटी येतो, मात्र यंदा तो विदर्भातून राज्यात आला आहे. आता तो वेगाने मध्य महाराष्ट्र व मुबंईकडे निघाला आहे.

25 टक्के देश काबीज केला

मान्सूनची पहिली शाखा सुमारे 60 टक्के देश काबीज करते. पण, यंदा दुसऱ्या शाखेने उणीव भरून काढली. तो बिहार, छत्तीसगड, ओडिशा, बिहार, मध्यप्रदेश मध्ये जोरदार मुसंडी मारत शुक्रवारी सक्रिय झाला. मान्सून एकाच दिवसात 25 टक्के देश व्यापला आहे.

हेही वाचा

पिंपरी : वल्लभनगर बसस्थानकात अस्वच्छतेचे साम्राज्य 

दर्शना पवारच्या मृत्यूप्रकरणी संशयितास फाशीची शिक्षा द्या; आई-वडिलांसह सकल मराठा समाजाची मागणी

Ashadhi Wari 2023: बावडा येथे तुकाराम महाराज पालखीच्या स्वागताची जय्यत तयारी

Back to top button