विवाहितेला प्रियकरासोबत राहण्याची उच्च न्यायालयाची अनुमती; पतीची याचिका फेटाळली | पुढारी

विवाहितेला प्रियकरासोबत राहण्याची उच्च न्यायालयाची अनुमती; पतीची याचिका फेटाळली

डेहराडून : उत्तराखंड उच्च न्यायालयाने एका प्रकरणात विवाहितेला तिच्या पतीऐवजी प्रियकरासह राहण्याची परवानगी दिली आहे. ही विवाहिता आपल्या मर्जीने तिच्या प्रियकरासह राहत असल्यामुळे तिला प्रियकरासह राहण्याची अनुमती देण्यात येत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

विवाहितेच्या पतीने याबाबत याचिका दाखल केली होती. आमचे लग्न 2012 मध्ये झाले. त्यानंतर आम्हाला दोन मुले झाली. ऑगस्ट 2022 मध्ये पत्नी माहेरी गेली व परत आलीच नाही. माझ्या पत्नीला तिच्या मित्राने अवैधरीत्या आपल्या घरी ठेवले आहे. त्यामुळे मला माझ्या पत्नीचा ताबा मिळावा, अशी याचना त्याने याचिकेद्वारे केली होती. तथापि, पत्नीने सांगितले की, पती तिचा छळ करतो. त्यामुळे मी माझ्या मर्जीने मित्रासोबत राहत आहे. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर पतीची याचिका फेटाळून लावली.

हेही वाचा : 

Back to top button