नगर: अश्लील मेसेज करून ब्लॅकमेल करणार्‍याला अटक | पुढारी

नगर: अश्लील मेसेज करून ब्लॅकमेल करणार्‍याला अटक

नगर : पुढारी वृत्तसेवा :  इंस्टाग्राम आणि फेसबुकवरून तरुणीला अश्लील मेसेज करून त्यानंतर तरुणीला ब्लॅकमेल करणार्‍या आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून 8 मे रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कृष्णा शिवाजी बाचकर (वय 23, रा.थोरपडवाडी, ता.राहुरी, जि.अहमदनगर) बाचकर याने 2 एप्रिल 2023 ते 7 मे 2023 या काळात इंस्टाग्राम व व्हॉटस्अ‍ॅपवर व्हिडीओ कॉलवर जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या व पीडितेचा अश्लील व्हिडीओ तयार करून तो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले होते. सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांना माहिती मिळाली होती की, आरोपी कृष्णा बाचकर हा नागापूर येथे आला आहे. या माहितीच्या आधारे पथकाने आरोपीला अटक केली. बाचकर हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर इंदापूर व एमआयडीसी पोलिस ठाण्यात विनयभंगाचे दोन गुन्हे दाखल आहेत.

Back to top button