Nashik Crime : अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी तरुणाला 10 वर्षे सक्तमजुरी | पुढारी

Nashik Crime : अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी तरुणाला 10 वर्षे सक्तमजुरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. अक्षय किसन चौधरी (२७, रा. पंचशिलनगर, शिवाजीनगर) असे गुन्हेगाराचे नाव आहे.

अक्षयने दि. २ सप्टेंबर २०१९ रोजी पंचशिलनगर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. पीडितेस घरी सोडण्याच्या बहाण्याने त्याने अत्याचार करीत जिवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनुसार, उपनगर पोलिस ठाण्यात अक्षयविराेधात बलात्कारासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहायक पोलिस निरीक्षक सचिन चौधरी यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी पक्षातर्फे ॲड. अर्पणा पाटील यांनी युक्तिवाद केला. अक्षयविरोधात पुरावे असल्याने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. खरात यांनी अक्षयला परिस्थितिजन्य पुराव्यांआधारे शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस अंमलदार एस. एन. जगताप, पी. आय. खान, पी. व्ही. पाटील यांनी कामकाज पाहिले.

हेही वाचा : 

Back to top button