Maharashtra Cabinet Decisions | शेतकऱ्यांना मदत ते कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ, वाचा राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय | पुढारी

Maharashtra Cabinet Decisions | शेतकऱ्यांना मदत ते कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ, वाचा राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय

मुंबई; पुढारी ऑनलाईन : सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत देण्यात येणार असून त्यासाठी १५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. तसेच कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. यामुळे आता कंत्राटी ग्रामसेवकांना १६ हजार रुपये मिळणार आहेत. (Maharashtra Cabinet Decisions)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

मंगळवार १३ जून २०२३ रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

  • सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत करणार. १५०० कोटीस मान्यता.
    ( मदत व पुनर्वसन विभाग)
  • कंत्राटी ग्रामसेवकांचे मानधनात वाढ करण्याचा निर्णय. आता मिळणार १६ हजार रुपये.
    (ग्राम विकास)
  • अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्यात केंद्राप्रमाणे सुधारणा.
    (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग)
  • पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती वाढविली.
    (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग)
  • लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करणार.
    (पशुसंवर्धन विभाग)
  • पुणे येथे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार.
    (विधि व न्याय विभाग)
  • अतिरिक्त न्यायालये व जलदगती न्यायालयांना दोन वर्षे मुदतवाढ.
    (विधि व न्याय विभाग)
  • मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरिता पुनर्वसन गृहे योजना
    (दिव्यांग कल्याण विभाग)
  • स्वातंत्र्य सैनिकांना घरांसाठी जमीन देण्यासाठी कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादा वाढविली.
    (महसूल विभाग)
  • चिमूर आणि शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करणार.
    (महसूल विभाग) (Maharashtra Cabinet Decisions)

हे ही वाचा :

Back to top button