मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर दौर्‍यावर | पुढारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर दौर्‍यावर

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी (दि. 13) कोल्हापूर दौर्‍यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत तपोवन मैदान येथे ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम सायंकाळी चार वाजता होणार आहे.

मुंबईहून दु. 3.45 वाजता विमानतळावर त्यांचे आगमन होईल. तेथून ते तपोवन मैदानात येणार आहेत. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे, राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम संपताच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सायंकाळी 6.15 वाजता कोल्हापूर विमानतळावरून मुंबईला रवाना होतील.

Back to top button