Nashik : कसारा घाटात चार वाहनांचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू | पुढारी

Nashik : कसारा घाटात चार वाहनांचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

मुंबई आग्रा महामार्गावरील नवीन कसारा घाटात मुंबईकडे जाणाऱ्या ब्रेक फेल पाँईट जवळ आज (दि.5) पहाटेच्या सुमारास चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात २ जण जागीच ठार झाले तर १ जण गंभीर जखमी झाला.

अपघातातील जखमीला जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांनच्या मोफत रुग्णवाहिकेद्वारे इगतपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे कारण अस्पष्ट असून आयशर, छोटा हत्ती आणि दोन पिक अप अशा चार वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात दोन्ही पिकअप गाड्यांमधील कोंबड्या मृत्युमुखी पडुन रस्त्यावर पडल्या. त्यामुळे रस्त्यावर मृत कोंबड्याचा खच झाला. कसारा पोलीस आणि महामार्ग पोलीस, रूट पेट्रोलिंग टीम घटनास्थळी दाखल होऊन अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आले.

इस्तकार इजहर खान वय २५, मुस्तफा खान वय ३५ अशी मयतांची नावे असून वजीर खान हे जखमी व्यक्तीचे नाव आहे. या अपघातामुळे काही काळ वाहतुक विस्कळीत झाली होती मात्र महामार्ग पोलीसांनी अपघातग्रस्त वाहने बाजुला करून वाहतुक सुरळीत केली.

हेही वाचा :

Back to top button