

पुढारी ऑनलाईन डेस्क : आठवड्याच्या पहिल्या दिवशी आज ( दि. ५) शेअर बाजाराने दमदार सुरुवात केली आहे. व्यवहाराला प्रारंभ होताच देशांतर्गत निर्देशांक बीएसई सेन्सेक्स सुमारे ३५० अंकांनी वाढून ६२,९०० वर पोहचला. तर एनएसई निफ्टीनेही ५० अंकांच्या उसळीसह 18500 चा टप्पा पार केला आहे. बँक निफ्टी २५० अंकांनी झेप घेत ४४, १८१ वर पोहोचला.
आज शेअर बाजारात मेटल, ऑटो आणि रियल्टी शेअर्स आघाडीवर असल्याचे दिसत आहे. शुक्रवार २ जून रोजी सेन्सेक्स ११८ अंकांनी उसळी घेत ६२,५४७ वर बंद झाला होता.