RBI : चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे गेल्यास तातडीने मिळण्यासाठी काय करावे? | पुढारी

RBI : चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे गेल्यास तातडीने मिळण्यासाठी काय करावे?

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

आता युपीआयच्या ऑनलाईन व्यवहारामुळे बॅंकेच्या रांगेत उभारण्याची गरज उरली नाही. पैशांच्या देवाण-घेवाणीचं कामं ऑनलाईनमुळे सहजसोपं झालेलं आहे. पण, डिजिटल पेमेंट करण्यामध्ये रिक्सदेखील असते, त्यातून फसवणूक होते, कधी-कधी चुकून दुसऱ्यांच्या बॅंक खात्यात पैसे जातात. मात्र, ऑनलाईन बॅंकिंगला सहज सोपं करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने (RBI) नुकतेच काही निर्णय घेतलेले आहेत.

जर तुमच्याकडून पैसे ट्रान्सफर करताना दुसऱ्याच्या बॅंक खात्यात पैसे गेले असतील तर, खाली दिलेले उपाय माहीत करून घ्या. कारण, पुढच्या वेळेपासून तुम्ही सावधान रहाल. रिझर्व्ह बॅंकेचे काही गाईडलाईन्सच्या मदतीने तुम्ही दुसऱ्याच्या अकाऊंटमध्ये गेलेले पैसे तातडीने रिफंड करू शकता.

आरबीआयचे गाईडलाईन्स पहा… 

जेव्हा तुम्ही एटीएम आणि युपीआय किंवा नेटबॅंकिंगवरून व्यवहार करत असाल, तर तुम्हाला लगेचच एक मॅसेज येईल. त्यातून कन्फर्म केलं जाईल की, तुम्ही खरंच बरोबर व्यवहार केला आहे की, चुकीचा व्यवहार केला आहे. या मॅसेजमध्ये एक फोन नंबरदेखील दिला जाईल. जर तुम्ही पाठवलेले पैसे चुकून दुसऱ्याच्या खात्यात गेले असतील, तर तुम्ही लगेचच दिलेल्या फोन नंबरवरून फोन करून सांगू शकता की, हा व्यवहार चुकून झालेला आहे. आरबीआयने सांगितले आहे की, असे फोन आले की, संबंधित बॅंकेने लगेच ॲक्शन घ्यावी.

तुम्ही काय करू शकता? 

तुम्ही अशा अडचणींमध्ये अडकला असाल तर लगेच संबंधित बॅंकेला फोन करून त्याची माहिती द्यायला हवी. चुकून व्यवहार झाला असेल किंवा फसवणूक करून व्यवहार झाला असेल तर, त्याची सर्व माहिती बॅंकेला तुम्ही द्यायला हवी. तुम्ही बॅंकेच्या कस्टमर केअरला फोन करू शकता किंवा स्वतः बॅंकेत जाऊ शकता. इथं तुमचे पैसे ज्या खात्यात गेले आहेत, त्या खाते क्रमांक, तारीख, वेळ सर्व सांगावं लागेल. ज्याला तुम्ही चुकून पैसे पाठवले आहेत, त्याच्याशी बॅंक संपर्क साधू शकते.

संबंधित व्यक्ती पैसे देण्यास नकार देत असेल तर… 

जर बॅंक संपर्क करूनदेखील संबंधित पैसे परत करत नसेल तर कायदेशीर पाऊल उचलू शकता. तुम्हाला केस कोर्टापर्यंत न्यावी लागेल. आरबीआयदेखील (RBI) यासंदर्भात सूचना देते. पण, या प्रक्रियेत प्रकरण जास्त वाढू शकते. अशा प्रकरणात बॅंकेदेखील जबाबदार ठरत नाही.

जर तुम्ही ज्याला पैसे पाठवायचे आहेत, त्या अकाऊंट नंबर चुकीचा टाकला असेल आणि तुमच्या खात्यातून पैसे कापले गेले असतील. तरीही तुमचे पैसे पुन्हा क्रेडिट केलं जाईल. तिथं युपीआयमधून व्यवहार करताना जो चुकून अकाऊंट नंबर टाकला असेल तर तुमचे पैसे कापलेच जाणार नाहीत. कारण, तुमचा व्यवहारच होणार नाही.

पहा व्हिडीओ : मुंबईच्या रेल्वे डब्यामध्ये सुरू झाले रेस्टॉरंट

हे वाचलंत का? 

Back to top button