Priyanka Gandhi : "इंधन करातून मोदी सरकारने २३ लाख कोटी कमावले" - पुढारी

Priyanka Gandhi : "इंधन करातून मोदी सरकारने २३ लाख कोटी कमावले"

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीवरून विरोधाकांनी मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. आता इंधन दरवाढीवरून मोदी सरकारवर काॅंग्रेसचे सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनीदेखील जोरदार टीका केली आहे. प्रियांका गांधी यांनी ट्विटवरून म्हणाल्या की, “पेट्रोल आणि डिझेलवर कर लावून सरकारने २३ लाख कोटी रुपये कमावले आहेत”, अशी टीका त्यांनी केली आहे.

आपल्या ट्विटरवरून प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी म्हंटलं आहे की, “जेव्हा तुम्ही दररोज महाग पेट्रोल आणि डिझेल खरेदी करता तेव्हा लक्षात ठेवा की, मोदी सरकारने पेट्रोलियम उत्पादनांवर लावलेल्या करातून २३ लाख रूपये कमावले आहेत. रोज महाग भाज्या, तेल विकत घेताना लक्षात ठेवा की, या सरकारने ९७ टक्के कुटुंबांचे उत्पन्न कमी केले. पण, मोदींचे अब्जाधीश मित्र दररोज १००० कोटी कमावत आहेत”, अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली आहे.

यापूर्वी काॅंग्रेसचे नेते राहूल गांधी यांनीही मोदी सरकारवर इंधन दरवाढीवरून निशाणा साधला होता. त्यांनी त्यात म्हंटलं होतं की, “केंद्र सरकार देशातील जनतेची घृणास्पद चेष्टा सुरू केली आहे.” सध्यस्थितीला पेट्रोल-डिझेलच्या किमती रोज वाढत आहेत. पुन्हा आजही पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाच्या प्रतिलीटर दरात ३५ पैशांनी वाढ केलेली आहे.

पेट्रोलिय कंपन्यांनी आज जाहीर केल्यानुसार दिल्लीत पेट्रोल १०६,८९ आणि डिझेल ९५.६२ रुपये इतके दर आहे. मुंबईत पेट्रोलच्या प्रतिलीटर दर ११२.७८ रुपये तर, डिझेल १०३.६३ रुपये द्यावे लागत आहेत. इंधन दरवाढीवरून विरोधकांनी मोदी सरकारवर चांगलाचं निशाणा साधलेला आहे. काॅंग्रेसचे नेत्या प्रियांका गांधी आणि काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महागाईवरून केंद्रावर टीका वारंवार करत असल्याचे दिसत आहेत.

पहा व्हिडीओ : अनिल परब यांच्या रिसॉर्टची माहिती किरीट सोमय्यांना रामदास कदमांनी दिली?

Back to top button