हज यात्रेसाठी दोन्ही डोस घेणे आवश्यक : अल्पसंख्यांक मंत्री नक्वी | पुढारी

हज यात्रेसाठी दोन्ही डोस घेणे आवश्यक : अल्पसंख्यांक मंत्री नक्वी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा

पुढील वर्षी हज यात्रेसाठी जे लोक जाऊ इच्छितात, त्यांनी दोन्ही डोस घेतलेले असणे आवश्यक आहे, अशी माहिती केंद्रीय अल्ससंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी शुक्रवारी दिली. भारत तसेच सौदी अरेबिया सरकारने कोरोनाच्या संदर्भात निश्चित केलेल्या दिशानिर्देशांचे पूर्ण पालन करणार्‍या लोकांनाच हज यात्रेला परवानगी दिली जाणार असल्याचेही नक्वी यांनी एका बैठकी दरम्यान दिली.

पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हज 2022 साठीची घोषणा केली जाणार असून त्यावेळी अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आणि डिजिटल असेल, असे नक्वी यांनी स्पष्ट केले.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलचे तसेच दिशानिर्देशांचे पालन सक्तीने केले जाणार आहे. पुरुष नातलगांशिवाय हज यात्रेला जाण्यासाठी तीन हजार महिलांनी गतवर्षी अर्ज केले होते.

2020 आणि 2021 साली ज्यांनी असे अर्ज केले होते, ते 2022 वर्षासाठीची ग्राह्य धरले जाणार आहेत, असे नक्वी यांनी नमूद केले.

हेही वाचलत का?

Back to top button