शाहरुख खान पोहोचला जेलमध्ये, एनसीबी टीम पोहोचली मन्नत बंगल्यावर ! | पुढारी

शाहरुख खान पोहोचला जेलमध्ये, एनसीबी टीम पोहोचली मन्नत बंगल्यावर !

पुढारी ऑनलाईन डेस्क

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी (aryan drug case) कारागृहात आहे. चॅटमधून काही माहिती समोर आल्यानंतर  एनसीबीचे पथक शाहरुख खानच्या घरी पोहोचले. (aryan drug case) एनसीबी हे शाहरुखच्या मुंबईतील वांद्रे येथील मन्नत बंगल्याच्या बाहेर दाखल झाले आहेत. एनसीबीकडून सर्च ऑपरेशन सुरू असून आहे.

मागच्या दोन आठवड्यापासून अटकेत असलेल्या आर्यनला भेटण्यासाठी शाहरूख खान गेला. शाहरूख आणि आर्यन यांच्यात तब्बल ३० मिनिटे चर्चा झाली.

आज सकाळी ९ वाजता (दि.२१) तो ऑर्थर रोड कारागृहामध्ये पोहोचला. त्याला भेटण्यासाठी परवानगी देण्यात आली होती.

शाहरुखचा मन्नत बंगला
शाहरुखचा मन्नत बंगला

दरम्यान शाहरूख खान आणि आर्यन यांच्यात कोणती चर्चा झाली याबाबत काहीही स्पष्ट करण्यात आले नाही. शाहरूख सोबत कोणीही घरचे कोणीही नसल्याचे दिसून आले. तो ऑर्थर रोड कारागृहमध्ये येताना कोणताही गाजावाजा न करता छोट्याशा वाहनातून गुपचुप आल्याने कारागृह परिसरात अचानक गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

२ ऑक्‍टोबर रोजी मुंबईतील एक क्रुझवरील रेव्‍ह पार्टींवर एनसीबीने छापा टाकला होता. यावेळी आर्यन खान, अरबाज मर्चेंटसह सहा जणांना ताब्‍यात घेण्‍यात आले होते. यानंतर याप्रकरणी आर्यन खानसह आठ जणांना अटक करण्‍यात आली. यामध्‍ये दोन युवतींचाही समावेश आहे. न्‍यायालयांनी सर्व संशयित आरोपींना न्‍यायालयीन कोठडी सुनावल्‍यानंतर सर्वांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्‍यात आली होती.

Back to top button